शहरभर कोंडी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

पुणे - अंगारक संकष्ट चतुर्थी आणि नाताळनिमित्ताने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये मंगळवारी (ता.२५) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्त्यावरील वाहतूक अतिशय संथगतीने सुरू होती.

चतुर्थी आणि नाताळनिमित्त नागरिक दर्शन आणि प्रार्थनेसाठी अनुक्रमे मंदिर आणि चर्चमध्ये मोठ्या प्रमाणात जात असतात. यंदा चतुर्थी आणि नाताळ एकाच दिवशी आले आल्याने नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू होती. तशातच शिवाजी रस्त्यावर बस आणि अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. मात्र, ही वाहने आदेश झुगारून या रस्त्यावर आल्याने महापालिकेपासून शनिवारवाडा आणि दगडूशेठ गणपती मंदिर ते स्वारगेटपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावरील सिंग्नल यंत्रणाही बंद होती. अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने या रस्त्यावरील वाहने बाजीराव रस्त्यावर आली. परिणामी महापालिकेपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: Traffic by Angarathi Chaturthi and Christmas