वाहतूक कोंडीचा ‘फास’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

भोसरी - भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका मिळविण्यासाठी महापालिकेद्वारे राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली. मात्र, नियोजनाअभावी अद्यापही भोसरीतील आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ आहे. या कोंडीमुळे भोसरीकरांना भोसरी-आळंदी रस्ता चौक ते बनाचा ओढा हे सुमारे दीड किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल पंचवीस मिनिटांचा वेळ लागतो.

भोसरी-आळंदी रस्त्यावर जड वाहन आल्यास वाहतूक कोंडीला सुरवात होते. काही मिनिटांत दोन्ही बाजूकडील रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. त्यामुळे आळंदी रस्त्यावरील वाहतूक संथगतीने पुढे जाते. वेळेबरोबर पैशाचाही अपव्यय होत असल्याने या रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी एकत्र येऊन पावले उचलली पाहिजेत.
- राजाराम शिंदे, वाहनचालक, आळंदी

भोसरी-आळंदी रस्त्यात वाहतूक पोलिसांची नियुक्ती आहे. आळंदी रस्त्यावर नो पार्किंगमधील वाहनांवर नेहमीच कारवाई करण्यात येत आहे. आळंदी रस्त्यावरील मंगल कार्यालयात समारंभ असल्यास आळंदी रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. याविषयी मंगल कार्यालयचालकांना वेळोवेळी नोटीसही बजाविण्यात आली आहे.
- अरुण ओंबासे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, भोसरी

वाहतूक कोंडीची कारणे
 दुतर्फा सम-विषम पार्किंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन
 वाहतूक पोलिसांद्वारेही कोणतीही कारवाई नाही
 दुकानदारांच्या पदपथांवर अतिक्रमणांमुळे पादचारी मुख्य रस्त्यावर
 हातगाड्यांच्या अतिक्रमणाकडे महापालिकेचे दुर्लक्ष
 चार मंगल कार्यालयांमधील वाहनांचे रस्त्यावर पार्किंग
 वरातीमुळेही वाहतूक कोंडीत भर
 धावडेवस्तीच्या बाजूने पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांकडून सेवा रस्त्याचा वापर
 सेवा रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे आळंदी रस्त्यावर कोंडी

Web Title: Traffic in Bhosari