..म्हणून पुणे - मुंबई महामार्गावर होतेय वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लाबं रांगा

राजेंद्रकृष्ण कापसे
Monday, 25 January 2021

मुळशी बाजूने साताऱ्याकडे जाणारा महामार्गावर उड्डाणपूल उतरतो. त्याचे काम सुरू आहे. तेथील पुलाचा खांब उभारण्याचे काम सुरू आहे. खांबाच्या शेजारी कडेला पत्रे लावले आहेत. तसेच, डाव्या बाजूला देखील पत्रे लावलेले आहेत.

वारजे माळवाडी(पुणे) : चांदणी चौकातील बहुमजली पुलाचे काम सुरू आहे. यामुळे, हिंजवडी, मुंबई बाजूला जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. दररोज येथे गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होते. रविवारी दुपारी संध्याकाळी वाहनांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या. सोमवारी सकाळी हिंजवडी, मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर अधिक गर्दी होते. 

मुळशी बाजूने साताऱ्याकडे जाणारा महामार्गावर उड्डाणपूल उतरतो. त्याचे काम सुरू आहे. तेथील पुलाचा खांब उभारण्याचे काम सुरू आहे. खांबाच्या शेजारी कडेला पत्रे लावले आहेत. तसेच, डाव्या बाजूला देखील पत्रे लावलेले आहेत. परिणामी तीन मार्गिका(लेन) ऐवजी दोन मार्गीका असल्याने असल्याने रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होते. रविवारी दुपारी वाहुतक कोंडी कोथरुड पुलापर्यत पोचली होती. संध्याकाळी ती वेदभवन खिंडीपर्यंत पोचली होती. सोमवारी सकाळी हिंजवडी, मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. 

पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे​

वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले की, "महामार्गावर बावधन परिसरात पुलाच्या कामामुळे  रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी होते. त्याचा फुगवटा मागे एक- दीड किलोमीटर पर्यत वाढत जातो. तो परिसर हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्याबाजूला वाहतूक कोंडी झाल्यास आम्ही त्याची माहिती देतो. 

 

पुण्यात १३ तृतीयपंथीयांना अटक; सिग्नलवर वाहनचालकांना धमकावून उकळायचे पैसे​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic to Hinjewadi is slow due to work at Chandni Chowk