वाहतूककोंडीमुळे विद्यार्थ्यांना करावी लागतोय अडथळ्यांची शर्यत

हडपसरमधील उड्डाणपुल वाहतुकीसाठी बंद असल्याने अनेक वाहनचालक मिळेल त्या रस्त्याने वाहने घुसवत आहेत, त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर वाहतूककोंडी होऊन स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Traffic Issue
Traffic IssueSakal
Updated on
Summary

हडपसरमधील उड्डाणपुल वाहतुकीसाठी बंद असल्याने अनेक वाहनचालक मिळेल त्या रस्त्याने वाहने घुसवत आहेत, त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर वाहतूककोंडी होऊन स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

उंड्री - रस्त्यांची (Road) दुर्दशा आणि वाहतूककोंडीमुळे (Traffic) विद्यार्थ्यांना (Student) शाळेत (School) पोहोचताना अडथळ्यांचा (Problem) सामना करावा लागत आहे. रस्त्याची आणि उड्डाण पुलाचे (Flyover) काम होईपर्यंत ससाणेनगर रेल्वे गेट क्र.७ आणि काळेबोराटेनगर रेल्वे गेट क्र.८ वाहतुकीसाठी खुले करावे, अशी मागणी विद्यार्थी-पालकवर्गाकडून होऊ लागली आहे.

हडपसरमधील उड्डाणपुल वाहतुकीसाठी बंद असल्याने अनेक वाहनचालक मिळेल त्या रस्त्याने वाहने घुसवत आहेत, त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर वाहतूककोंडी होऊन स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोनाची भीती सतावत आहे. मात्र, शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्यासाठी पालकांची घालमेल होऊ लागली आहे, अशी भावना पालकांची झाल्याचे प्रा. शोएब शफी इनामदार यांनी सांगितले.

दिपाली कवडे, मीना थोरात म्हणाल्या की, सय्यदनगर रेल्वेगेटजवळील रस्ता खोदला असून, हडपसरमधील उड्डाण पुल बंद असल्याने वाहतूककोंडी झाली आणि नोकरदार, कामगार, कष्टकरी, रुग्ण, शाळकरी मुले, लसीकरणासाठी जाणाऱ्यांची आज प्रचंड गैरसोय झाली. सय्यदनगर आणि काळेबोराटेनगर रेल्वे गेट बंद केल्यामुळे हांडेवाडी रोड, चिंतामणीनगर, सय्यदनगर, महंमदवाडी परिसरातील नागरिकांसाठी शहर आणि उपनगरांमध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ते उपलब्ध करून द्यावेत, असा सूर नागरिक वाहनचालकांकडून उमटू लागला आहे.

Traffic Issue
शरद पवार भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगासमोर देणार साक्ष

हांडेवाडी आणि महंदवाडी रस्त्यावर जलवाहिनी टाकण्यासाठी रेल्वे गेटजवळ रस्ता खोदल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर हडपसर उड्डाणपूल बंद असल्याने पुणे सोलापूर रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांना प्रचंड सहन करावा लागत आहे, या रस्त्यावर अनेक दवाखाने व हॉस्पिटल असून, येणाऱ्या रुग्णांना वाहतूक कोंडीचा अडसर होत आहे. त्यामुळे नवीन रस्त्याची आणि बंद रस्त्याची माहिती असणारे दिशादर्शक फलक जागोजागी लावावेत, अशी मागणी रिक्षाचालक विक्रम आल्हाट यांनी केली.

रहेमान शेख, शहाजी खंडागळे, खंडू जगताप म्हणाले की, हडपसरमधील उड्डाण पुलाची दुरुस्ती होईपर्यंत नागरिकांच्या सोसीयाठी कात्रज-मंतरवाडी बायपास मार्गे हांडेवाडी आणि महंमदवाडीतून हडपसरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी रस्त्याचे माहिती आणि दिशादर्शक फलक लावावेत. वानवडीकडे जाण्यासाठी मार्ग, एनआयबीएम रस्ता, ससाणेनगर रेल्वेगेटपासून रामटेकडी आणि काळेबोराटेनगर रेल्वेगेटपासून फुरसुंगीकडेकडे जाणारा रस्ता, कालव्यावरील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करून सोलापूर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करता येईल, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com