हिंजवडीकर वैतागले, रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प 

PNE19P72725.jpg
PNE19P72725.jpg

हिंजवडी : सोमवारी (ता. 8) दिवसभर झालेल्या पावसामुळे हिंजवडी, माणगावातून फेज 3 कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाले. त्यामुळे आयटीयन्सला तब्बल तीन ते चार तास अडकून राहावे लागले. 

हिंजवडी, माणगावातून फेज थ्रीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेकांनी मोऱ्या, गटारी बुजविल्या आहेत. तसेच, रस्त्याच्या कडेला व्यावसायिकांनी गाळ्यांसाठी मुरूमाचे भराव टाकल्याने मुख्य रस्त्यावर पाणी येऊन रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे फेज थ्री ते चांदे फाटा, माणगावपर्यंत तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने त्यातून मार्ग काढताना आयटीयन्सना मोठी कसरत करावी लागली. रात्री उशीरापर्यंत येथील वाहतूक ठप्प होती. 

फेज थ्री येथे मेगापॉंलीस टाऊनशिप लगत बी. जी.शिर्के यांचे कंस्ट्रक्‍शन साईट सुरू आहे. डोंगराचे पाणी पारंपारीक ओढ्यानाल्यांनी येत असल्याने पूर्वी येथे रस्त्यावर पाणी येण्याचे प्रकार घडत नव्हते. मात्र यावर्षी माण हिंजवडी रस्त्याचे रूंदीकरण व डांबरीकरण झाल्याने या रस्त्यालगत भराव टाकून अनेकांनी व्यावसायिक गाळे व दुकाने काढली आहेत. तर काहींनी पाणी वाहून जाणाऱ्या मोऱ्याच बंद केल्याने सर्व पाणी रस्त्यावरून वाहू लागले आहे. हा रस्ता शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने भराव टाकणाऱ्यांवर कुठलीच कारवाई होत ऩाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने बेकायदा भराव टाकून मोऱ्या बंद करणाऱ्यांना नोटिसा काढल्या असून पोलिसांकडे तक्रारही केली आहे. मात्र हिंजवडी पोलिसांनी याकडे गांभीर्याने न पाहता कानाडोळा केल्याचे नागरिकांनी सांगितले. 

सोमवारी आयटी कंपन्या सुटण्याच्या वेळेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशीरापर्यंत वाहने अडकून पडल्याने सुमारे तीन ते चार किलो मीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांनी व व्यावसायिकांनी रस्त्यालगत भराव टाकून मोऱ्या बंद केल्यात त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह आयटीयन्स प्रवाशांमधून होत आहे. 
याबाबत शाखा अभियंता अनिल शिंदे म्हणाले, आम्ही संबधितांना नोटिसा बजावल्या आहेत. आता तहसीलदारांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहिम राबविणार आहोत. हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,बांधकाम विभागाचे अधिकारी मला भेटलेच नाहीत.त्यांनी एफआयआर दिली तर संबधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करू. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com