Amitesh Kumar : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’; ट्रॅफिक वॉर्डनची संख्या करणार सातशे

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. केवळ दंडात्मक कारवाई करण्याऐवजी वाहतूक नियमनावर अधिक भर राहील.
Pune Police Commissioner Amitesh Kumar
Pune Police Commissioner Amitesh Kumarsakal

पुणे - शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. केवळ दंडात्मक कारवाई करण्याऐवजी वाहतूक नियमनावर अधिक भर राहील. प्रायोगिक तत्त्वावर कोंडीचे दहा ‘हॉटस्पॉट’ निश्चित केले आहेत. ट्रॅफिक वॉर्डनची संख्या दोनशेवरून सातशे करण्यात येतील. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी महापालिका आणि संबंधित घटकांच्या मदतीने ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी (ता. १६) ‘सकाळ’ कार्यालयात सदिच्छा भेट दिली. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात वाघोली, गणेशखिंड रस्त्यावरील सिमला ऑफीस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋषीजी चौक परिसर घेण्यात आला आहे.

या चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महामेट्रो, पीएमआरडीए आणि महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच बैठक घेतली. मेट्रोकडून लावण्यात आलेले बॅरिकेड॒स काम संपले की लगेच दूर करावेत, तसेच खड्डे बुजविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सध्या ट्रॅफिक वॉर्डनची संख्या दोनशेच्या जवळपास आहे. ही संख्या सातशे करण्यात येणार आहे.

ट्रॅफिक वॉर्डनही शिस्तबध्द, गणवेशात आणि प्रशिक्षित असावेत, असा आग्रह आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह स्वयंचलित सिग्नल्स, वाहनचालकांना सूचना देणारे फलक बसविण्याची गरज आहे.

अवजड वाहनांच्या वेळेबाबत परिपत्रक

वाघोली आणि गणेशखिंड या रस्त्यांवर पीक अवर’मध्ये लक्झरी बसेस, खडी वाहतूक करणारे डंपर आणि अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८.३० वाजेपर्यंत ही वेळ निश्चित केली आहे. परंतु अन्य रस्त्यांवर वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेऊन संपूर्ण शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या वेळेबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गतिरोधकांचा धोका दूर करणार

शहरात धोकादायक गतिरोधकांमुळे अपघात होत आहेत. वाहनचालक, रुग्ण, ज्येष्ठ नागरिकांना ते गैरसोयीचे ठरत आहे. त्यावर शहरातील गतिरोधकांचा आढावा घेण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही रस्त्यांवर धोकादायक गतिरोधक काढण्याबाबत महापालिका प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल, असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com