चार किलोमीटरसाठी लागले दोन तास; खडकवासला रस्त्यावर वाहनांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

शाळा, महाविद्यालय, कार्यालये यांना सुट्टी असल्याने रविवारी (ता.14) सकाळपासून पर्यटक सिंहगड-पानशेतकडे जात होते. साडे बारा वाजल्यापासून मोठया संख्येने पर्यटक येत होते.

खडकवासला : दुपारनंतर अचानक पावसाळी वातावरण झाल्याने रविवारी (ता.14) सिंहगड-पानशेतकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अचानक वाढली. खडकवासला धरण चौकात रस्त्यावर पावसाचे पाणी साठल्याने रस्ता एकेरी करावा लागला. परिणामी वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. किमान चार ते पाच किलोमीटर अंतरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे अंतर पार करण्यास पर्यटकांना दोन-अडीच तास वेळ लागत होता. रात्री 10 वाजेपर्यंत वाहने पुण्याकडे जात होती.

शाळा, महाविद्यालय, कार्यालये यांना सुट्टी असल्याने रविवारी (ता.14) सकाळपासून पर्यटक सिंहगड-पानशेतकडे जात होते. साडे बारा वाजल्यापासून मोठया संख्येने पर्यटक येत होते. सकाळी लवकर गडावर गेलेले पर्यटक एक वाजता पुण्याकडे जात होते. साडे तीन वाजता दोन्ही बाजूने येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाहनाची संख्या वाढत गेली. काही वाहन चालकांनी डोणजे सिंहगड घाट रस्ता कोंढणपूर खेडशिवापूर मार्गे पुण्यात येणे पसंत केले.

फक्त पुण्याला जाणाऱ्या मार्गावर दर मिनिटाला 25 ते 30 चारचाकी तर 70 ते 75दुचाकीने जात होते. तासाला साडेचार हजार दुचाकी तर अठराशे चार चाकी वाहने जात होता.  दुपारी साडेतीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत साधारणतः वीस ते पंचवीस हजार दुचाकीने व आठ ते दहा हजार चारचाकी पुण्याच्या दिशेने वाहने गेली. सुमारे तीस ते पस्तीस हजार वाहने या परिसरात आली होती. यामध्ये बस रिक्षा ट्रक टेंपो यांचा समावेश नव्हता.

पाऊण लाख पर्यटक
20 हजार दुचाकीवरून 40 हजार पर्यटक तरआणि आठ हजार चारचाकी मधून किमान पाच पर्यटक धरले असता 40 हजार पर्यटक चारचाकीने आले होते दुचाकी व चारचाकी मिळून 80 हजार पर्यटक होतात. 

किमान 75 हजार तरी पर्यटक या परिसरात आले होते. लाखापर्यंत पर्यटक आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam on Khadakwasala Sinhgad road