पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव, मंचर, खेड, चाकण ही ठिकाणे वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर मार्च नंतर झालेला लॉकडाऊन व प्रवासावर आलेल्या मर्यादा या मुळे वाहतूक कोंडीची समस्या मागील आठ महिने दूर झाली होती. मात्र मागील तीन दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या पूर्ववत झाल्याने चालक व प्रवासी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नारायणगाव(पुणे) : दिवाळी निमित्ताने पुणे व नाशिककडे जा-ये करणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने येथील पुणे नाशिक महामार्गावर मागील तीन दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे नारायणगाव पोलिसांचा दिवाळी सण येथील महामार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी गेला. वाहतूक कोंडीच्या समस्येतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी येथील बाह्यवळण रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेले काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव, मंचर, खेड, चाकण ही ठिकाणे वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर मार्च नंतर झालेला लॉकडाऊन व प्रवासावर आलेल्या मर्यादा या मुळे वाहतूक कोंडीची समस्या मागील आठ महिने दूर झाली होती. मात्र मागील तीन दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या पूर्ववत झाल्याने चालक व प्रवासी यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हे वाचा - दिवाळीत घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना अटक; 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
यामुळे नारायणगाव ते पुणे प्रवासासाठी एक ते दीड तास जास्त वेळ लागत आहे. सहायक पोलिस निरीक्षक डी.के. गुंड व वाहतूक पोलिस स्वतः महामार्गावर उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते. २३ नोव्हेंबर पासून शाळा व महाविद्यालये सुरू होणार असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत भर पडणार आहे. वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी संथ गतीने सुरू असलेले येथील बाहय वळण रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लक्ष घालणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.