Video : निगडीत झाड पडल्याने वाहनांच्या लांबपर्यंत रांगा  

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

पिंपरी : निगडीतील लोकमान्य टिळक चौकाकडून त्रिवेणीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचे झाड पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या रस्त्यावरील सहा क्रमांकाच्या इमारतीसमोरील हे झाड सकाळी सातच्या सुमारास अचानक कोसळले.

पिंपरी : निगडीतील लोकमान्य टिळक चौकाकडून त्रिवेणीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगतचे झाड पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या रस्त्यावरील सहा क्रमांकाच्या इमारतीसमोरील हे झाड सकाळी सातच्या सुमारास अचानक कोसळले. यामुळे लोकमान्य टिळक चौकाकडून त्रिवेणीनगरकडे जाणारी आणि त्रिवेणीनगरकडून लोकमान्य टिळक चौकाकडे येणारी वाहतूक ठप्प झाली.

वाहतूक कोंडीत तळवडे आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाहनांसह शाळा, महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी अडकले. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. ही रांग लोकमान्य टिळक चौकापर्यंत पोहोचल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडली. 

दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर झाड बाजूला हटविले. निगडी येथील दुर्गानगर चौकाकडून त्रिवेणीनगर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते. या रस्त्यावरुन जाताना दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत होती. निगडीतील सेक्‍टर क्रमांम 23 येथील संग्रामनगर व सम्राटनगर झोपडपट्टीतील घरांमध्ये पाणी शिरले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam at nigdi Due tree collapse