
नारायणगाव ही मोठी बाजारपेठ आहे.मात्र पे पार्किंगची सोय नसल्याने खरेदीसाठी आलेले ग्राहक वाहने महामार्गाच्या लगत उभी करतात.मीना नदी काठावर असलेल्या मुक्ताई देवस्थानच्या मोकळ्या जागेत पे पार्किंगची सुविधा ग्रामपंचायतने केल्यास पार्किंगची गैरसोय दूर होईल.
नारायणगाव: येथील पुणे नाशिक महामार्गालगत बस स्थानक परिसरात नो पार्किंग झोनमध्ये चार चाकी व दुचाकी वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी मुक्ताई देवस्थान ट्रस्टचे संचालक मुरलीधर फुलसुंदर यांनी केली आहे.
मागील एक महिन्यापासून येथील पुणे नाशिक महामार्गावर मीना नदी पूल ते रिगल पेट्रोल पंप दरम्यान व खोडद,जुन्नर रस्ता या भागात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहन चालक, प्रवाशी त्रस्त झाले आहेत. सद्य स्थितीत जुन्नर, संगमनेर तालुक्यातील विविध भागातील अत्यावस्थ व कोरोना रूग्ण रुग्णवाहिकेतून पुणे येथे नेले जातात. वाहतूक कोंडीचा सर्वात जास्त फटका रुग्णांना बसत आहे.
मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली
येथील महामार्गालगत कुरेशी मार्केट, फुलसुंदर मार्केट व बसस्थानक आवारात मोठ्या प्रमाणात चार चाकी व दुचाकी वाहने उभी केली जातात.या मुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.या पुर्वी या भागात वाहने उभी केल्यास पोलीस वाहनाला जॅमर लावून दंडात्मक कारवाई करत होते.माजी आमदार, जुन्नर पंचायत समितीच्या माजी सभापती यांच्या वाहनावर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र मागील सहा महिन्यात दंडात्मक कारवाईत शिथिलता आल्यामुळे नो पार्किंग झोनमध्ये चार चाकी व दुचाकी वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नारायणगाव ही मोठी बाजारपेठ आहे.मात्र पे पार्किंगची सोय नसल्याने खरेदीसाठी आलेले ग्राहक वाहने महामार्गाच्या लगत उभी करतात.मीना नदी काठावर असलेल्या मुक्ताई देवस्थानच्या मोकळ्या जागेत पे पार्किंगची सुविधा ग्रामपंचायतने केल्यास पार्किंगची गैरसोय दूर होईल.