खेड-शिवापूर टोल नाक्यावर तुफान वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त

महेंद्र शिंदे
Friday, 16 October 2020

पुणे-सातारा रस्त्यावर खड्डयातून वाट काढत त्रस्त झालेल्या प्रवाशांना शुक्रवारी सायंकाळी खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. 

खेड-शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावर खड्डयातून वाट काढत त्रस्त झालेल्या प्रवाशांना शुक्रवारी सायंकाळी खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सुट्टीचा दिवस नसतानाही टोल प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत होते.

सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे-सातारा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यातून वाहन चालविताना प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच शुक्रवारी सायंकाळी खेड-शिवापूर टोल नाक्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. खड्डयांमुळे त्रस्त झालेल्या सायंकाळी पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांना या वाहतूक कोंडीत अडकावे लागले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांना सुमारे वीस मिनिटे वेळ लागत होता. विशेष म्हणजे सुट्टीचा दिवस नसतानाही तसेच  रस्त्यावर वाहनांची गर्दी कमी असूनही टोल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांना टोल नाक्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत होते. 

सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

"गेल्या दोन दिवसांपासून पाऊस होता. शुक्रवारी पाऊस उघडल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली. त्यामुळे टोल नाक्यावर वाहनांची गर्दी झाली," असे खेड-शिवापूर टोल प्रशासनाचे म्हणणे आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam on Pune-Satara road