पुणे : वर्षाच्या सुरवातीलाच कोंडला शिवाजी, बाजीराव रस्त्याचा श्वास (व्हिडिओ)

अशोक गव्हाणे
मंगळवार, 1 जानेवारी 2019

शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजीराव आणि शिवाजी रस्त्यावर आज (ता. 01) सकाळी दहा वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. त्यामुळे वर्षाच्या सुरवातीलाच नागरिकांना वाहतूक कोंडीच्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. 

पुणे : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बाजीराव आणि शिवाजी रस्त्यावर आज (ता. 01) सकाळी दहा वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. त्यामुळे वर्षाच्या सुरवातीलाच नागरिकांना वाहतूक कोंडीच्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. 

शहरातील या दोन प्रमुख रस्त्यावर आज प्रचंड वाहतूक कोंडी होती. मंगळवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस असल्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा आशिर्वाद घेण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत झाली. म्हणूनच या रस्त्यावर आज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

स्वारगेटवरून निघाल्यावर तुम्ही शिवाजीनगरसाठी जाण्यासाठी गुगल मॅपला सर्च केले तरी, बाजीराव रस्त्यावरून जाण्याची सुचना गुगल सुचवत नाही. नियमितपणे स्वारगेटवरून शिवाजीनगरला जाण्यासाठी गुगल बाजीराव रस्त्याची सूचना करत असते. परंतु, आज ते सेव्हन लव्हज चौकातून जाण्याची सूचना करत आहे. शिवाजीनगरहून स्वारगेटला जाणाऱ्या आणि स्वारगेटहून शिवाजीनगरला जाणाऱ्या अनुक्रमे बाजीराव आणि शिवाजी रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. पार्किंगची सोयही या रस्त्यांवर नसल्याने रस्त्यावरच वाहने लावण्यात आल्याचे पाहायला मिळत होते.

Web Title: traffic jam On Shivaji Road and BajiRao Road