भोरमध्ये व्यावसायिकांमुळे रस्त्यावर अडथळा; पालिकेकडून कारवाईची मागणी  

भोरमध्ये व्यावसायिकांमुळे रस्त्यावर अडथळा; पालिकेकडून कारवाईची मागणी  
Updated on

भोर (पुणे) ः शहरातील काही व्यावसायीक आपली कामे शहरातील मुख्य रस्त्यांवर करीत असल्यामुळे अनेक वेळा वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय आठवड्यातून एक दिवसतरी रस्ता बंद करून संबंधित व्यावसायीक आपली कामे करीत आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या हद्दीतील काही रस्त्यांची कामे ही केवळ व्यावसायीकांसाठीच केली आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

नगरपालिका प्रशासन व पोलिस अशा व्यावसायीकांवर कडक कारवाई करीत नसल्यामुळे व्य़ावसायीकांनी रस्त्यावरच दुकानदारी सुरु केली आहे. हा रस्ता केवळ आमच्या व्यावसायासाठीच असल्याच्या आर्विभावात संबंधीत व्यावसायीक रस्त्यावरून जाणा-या वाहनचालकांशी व इतरांशी वाद घालीत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून लॉकडाऊनच्या नावाखाली काही व्यावसायीक व्यवसाय करण्यासाठी रस्त्यांवर आले. तेंव्हापासून आजपर्यंत त्यांचा व्यावसाय अद्यापही रस्त्यांवरच आहे.

शहरातील एका रस्त्यावर तर चोवीस चास पाच-सहा वाहने नियमीतपणे उभी असतात. त्यामुळे रस्ता अरुंद होतो आणि वाहनांची वारंवार कोंडी होते. काही सूज्ञ नागरिकांनी किंवा वाहनचालकांनी आक्षेप घेतला तर त्याच्याशी भांडण केले जाते. या मार्गावरून सर्वसामान्य नागरिकांना निटसे चालताही येत नाही. आणि चालता आले तरीही व्यावसायीकांच्या व्यावसायामुळे अंगावरील कपडे खराब होणे किंवा कर्कश आवाज कानावर येतो. त्यामुळे नागरिकांनी संबंधीत रस्त्यांवरून चालत जाणेही अवघड झाले आहे. नगरपालिका प्रशासन व पोलिसांनी या विषयात गांभिर्यांने लक्ष घालून संबंधीत व्यावसायीकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 
रस्त्यांवर व्यावसाय करून शहरातील वाहतूकीस अडथळा निर्माण करणा-या व्यावसायीकांना नगरपालिकेमार्फत 
नोटीस बजावलेली आहे. परंतु तरीही काही व्यावसायीक यास प्रतिसाद देत नाहीत. अशा व्यावसायींना जप्तीची 
नोटीस देवून रस्त्यांवरील त्यांचे सर्व साहित्य जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचे सागितले. 
अशा व्यावसायीकांवर कारवाई करण्यासाठी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येणार असल्याचेही मुख्याधिकारी 
विजयकुमार थोरात यांनी स्पष्ट केले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com