Pune Crime : कुख्यात नीलेश घायवळला वाहतूक पोलिसांचा दणका; सहा हजार रुपयांचा दंड वसूल

कुख्यात नीलेश घायवळ याच्यावर वाहतूक पोलिसांकडून खराडी परिसरात कारवाई करण्यात आली.
Crime
Crimesakal

पुणे - कुख्यात नीलेश घायवळ याच्यावर वाहतूक पोलिसांकडून खराडी परिसरात कारवाई करण्यात आली. मोटारीला गडद काळ्या रंगाच्या काचा लावल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी त्याच्याकडून सहा हजार रुपयांचा दंड वसूल केला.

कुख्यात नीलेश घायवळ मंगळवारी पुणे-अहमदनगर रस्त्यावरून साथीदारांसह निघाला होता. त्यातील मोटारीला काळ्या काचा असल्याने वाहतूक पोलिसांनी खराडी भागात त्याची मोटार अडवली. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. घायवळ याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, खंडणीसाठी अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई

शहरात ‘नो एंट्री’मधून, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मद्यपी वाहनचालक, भरधाव वाहन चालविणे, काळ्या काचा लावणाऱ्या वाहनांवर, ट्रिपल सीट दुचाकीस्वार यांच्याविरुध्द धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. वाहतूक नियमनास प्राधान्याने लक्ष देण्यात येत आहे. तसेच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com