वाहतूक पोलिसांची ‘स्मार्ट’ कारवाई

Traffic Police
Traffic Police

पुणे - शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. हे काम आणखी ‘स्मार्ट’ पद्धतीने करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘नंबर रीडिंग सॉफ्टवेअर’चा वापर सुरू केला आहे. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या नंबरचे छायाचित्र घेऊन ते आपोआप सिस्टीममध्ये अपलोड केले जात आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांचे कामही हलके झाले असून, प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग आता यशस्वी झाला आहे.

शहरातील चौकांमध्ये, रस्त्यांवर बाराशेपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यांच्या मदतीने सिग्नल तोडणे, ट्रिपल सीट, विनाहेल्मेट, झेब्रा क्रॉसिंग, नो एंट्री, राँग साइड यासह वाहतुकीचे विविध नियम मोडणाऱ्या सुमारे तीन ते साडेतीन हजार वाहनचालकांवर दिवसभरात कारवाई केली जात आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांना सीसीटीव्ही वाहनांवर नेऊन झूम करावा लागतो. त्यावरील नंबर व्यवस्थित दिसत असेल, तर त्याचा फोटो काढून तो सिस्टममध्ये अपलोड केला जातो. त्यानंतर त्याचे ई-चलन काढून संबंधित वाहनचालकाला दंड केला जात आहे. मात्र, यासाठी बराच वेळ जात आहे.

कारवाईची ही प्रक्रिया आणखी सोपी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर ‘नंबर रीडिंग सॉफ्टवेअर’चा वापर सुरू केला आहे. त्याद्वारे नियम तोडणाऱ्या वाहन व त्याच्या नंबरचा फोटो घेतला जातो. त्यासाठी सीसीटीव्ही झूम करण्याची गरज कर्मचाऱ्यांना पडत नाही. हे सॉफ्टवेअर दिलेल्या कमांडनुसार हा फोटो सिस्टममध्ये अपलोड करते. त्यात वाहनचालकाने कोणता नियमभंग केला आहे, हेदेखील नमूद केले जाते. त्यामुळे वाहतूक पोलिसांचेही काम सोपे झाले आहे.

पोलिसांनी काही सॉफ्टवेअरची चाचपणी केली आहे. सिंहगड रस्त्यावर चार ठिकाणी राबविण्यात आलेला हा प्रयोग यशस्वी झाला आहे. आता तो पूर्णपणे अमलात आणण्यासाठी आर्थिक बाबींचीही तपासणी करावी लागणार आहे.
- पंकज देशमुख, उपायुक्त, वाहतूक पोलिस शाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com