

Pune Traffic Diversion Update amit shah pune tour
esakal
Amit Shah Pune Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत दोन दिवस महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आज(ता.15) रविवार आणि सोमवार या दोन दिवशी शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांना पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आली असून, सोमवारी काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. विशेषतः सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ आणि पुणे जिल्हा परिषद परिसरातील कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.