पुणेकरांनो, 'या' कारणामुळे होणार वाहतूकीमध्ये बदल: 'हे' आहेत पर्यायी मार्ग

Transportation route will be changed due to work of Shivaji Nagar Metro Station
Transportation route will be changed due to work of Shivaji Nagar Metro Station

पुणे :  शिवाजीनगर येथील एसटी स्थानकाच्या आवारात मेट्रोच्या स्थानकाचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे शनिवारपासुन वाहनाना शिवाजीनगर चौकातुन नरवीर तानाजी वाडीकडे जाण्यास मनाई करण्यात आली. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतुक शाखेकडुन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा आहे बदल 
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने स.गो.बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक) पुणे वेधशाळा चौकात येणारी वाहतूक वेधशाळा येथील चौकातून वळविण्यात आली आहे. वेधशाळा समोरील चौकातून शिवाजीनगर एसटी स्थानक, नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे वाहनांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. वाहतूक शाखेने शनिवारपासुन तेथील रस्ता बंद केला आहे.


कोरोनाला रोखण्यासाठी पुणे पोलिसांचे आणखी एक पाऊल; नागरिकांच्या प्रवासावर येणार... 

असा वापरता येईल पर्यायी मार्ग

वाहनचालकांना स.गो.बर्वे चौक, वेधशाळा येथील चौकातून डावीकडे वळून चापेकर चौकातून (म्हसोबा गेट) वळून हातकागद संस्था, साखर संकुल मार्गे नरवीर तानाजी वाडीकडे (वाकडेवाडी) जाता येईल. तसेच वाहनचालकांनी चापेकर चौकातून वळून पुन्हा गणेशखिंड रस्त्याने प्राईड हॉटेल व एलआयसी कार्यालय यांच्यासमोरील गल्लीतून दळवी हॉस्पिटलमार्गे नरवीर तानाजीवाडीकडे जाता येणार आहे.

'पुणेरी पाटी'ने सुरु केलं ऑनलाइन युद्ध, विषय हैदराबादी बिर्याणीचा 

"मेट्रोचे काम सुरु झाल्याने हा मार्ग बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करुन पर्यायी मार्गाचा वापर करावा, सहकार्य करावे," वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी केले आहे. 

विद्यार्थ्यांनो, सीए परीक्षेची तयारी करताय? वाचा महत्वाची बातमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com