वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मार्च 2019

पुणे - ‘शहरातील रस्त्यांवर वाहने सामावून घेणे अशक्‍य झाले असतानाच मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पुणेकरांच्या सहकार्याने वाहतुकीत सुधारणा केल्या जातील. सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यास प्राधान्य असेल,’’ असे वाहतूक शाखेचे नवनियुक्त पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सोमवारी स्पष्ट केले. 

सातारा येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिलेल्या देशमुख यांची पुणे नियुक्ती झाली आहे. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी त्यांच्याकडे वाहतूक शाखेची जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार देशमुख यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास वाहतूक समस्या कमी होईल.

नागरिकांकडून त्यांच्या समस्या जाणून त्यांच्यावर उपाययोजना केल्या जातील. तसेच हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.

हे करणार
पादचाऱ्यांना सर्वाधिक प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न
अपघात रोखण्यासाठी महापालिका, पीएमपीसह विविध कार्यालयांशी समन्वय वाढविणार
बॉडी कॅमेऱ्यासाठी आर्थिक तरतुदीची शिफारस करणार
बंद पडणाऱ्या बसबाबत पीएमपी प्रशासनाकडे 
पत्रव्यवहार करणार  

भाजपच्या ‘त्या’ कार्यकर्त्यांवर कारवाई
भाजपने शहरात ‘विजय संकल्प’ रॅली काढली होती. यात दुचाकीवर सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी हेल्मेटचा वापर न करण्यापासून वाहतूक नियमांचेही उल्लंघन केले होते. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांवर कारवाईची तत्परता दाखविली नाही. याबाबत देशमुख म्हणाले, सीसीटीव्हीच्या आधारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केले जाईल.

Web Title: Traffic Solution Pankaj Deshmukh