
-विजय मोरे
उंडवडी : भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार व दुचाकीचा भीषण आपघात झाला. ही घटना श्री. संत तुकाराममहाराज पालखी महामार्गावरील उंडवडी सुपे ( ता. बारामती) हद्दीतील शिर्सुफळ फाट्यावर (ता. १०) गुरुवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली. या घटनेत दुचाकीस्वार व कार चालक या दोघांचा जागीच मृत्यू झाला.