सिव्हिल संक्षिप्त

सिव्हिल संक्षिप्त
Published on

डोणगावमध्ये ज्येष्ठाची
गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर : डोणगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील अनिल काशिनाथ देशेट्टी (वय ६५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास अनिल देशेट्टी यांनी घरातील लोखंडी ॲगलला साडीने गळफास घेतला होता. सलगर वस्ती पोलिसांच्या मदतीने त्यांना बेशुद्धावस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण काय, याचा शोध पोलिस घेत आहेत.
--------------
सोरेगाव परिसरात
तरुणाची आत्महत्या
सोलापूर : सोरेगाव येथील देव नगरातील बसवराज गुंडेप्पा दिंडोरे (वय २९) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या सुमारास बसवराज दिंडोरे हा गळफास घेतलेल्या आवस्थेत घरात आढळला. त्याला विजापूर नाका पोलिसांच्या मदतीने बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध विजापूर नाका पोलिस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com