ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने जगातील देशांना भारतासोबत शांतता आणि सलोख्याचे आवाहन केले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टद्वारे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या या विधानाला भारत सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दुजोरा दिला आहे. तरीही देशात सावधानगिरी बाळगण्यात येत आहे. यामुळे पुण्यातून जम्मूकडे जाणाऱ्या रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.