भाजप पदाधिकाऱ्यांना वादग्रस्त विधानांसाठी प्रशिक्षण : माजी आमदार रमेश थोरात

Training for controversial statements of BJP officers says Former MLA Ramesh Thorat
Training for controversial statements of BJP officers says Former MLA Ramesh Thorat

दौंड (पुणे) : आमदार राम कदम यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची वादग्रस्त वक्तव्ये अचानकपणे निघालेली नसून त्यांना त्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. कोणी कोणावर बोलायचे याचे देखील प्रशिक्षण पक्षाकडून त्यांना दिले जात आहे, असा आरोप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात यांनी केला आहे. 

दौंड शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोरून आज (ता. ६) इंधन दरवाढ कडे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आलेल्या सायकल रॅलीनंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारतसमोरील सभेत बोलताना आमदार रमेश थोरात यांनी हा आरोप केला. उपनगराध्यक्ष राजेश जाधव, वैशाली नागवडे, राणी शेळके, अप्पासाहेब पवार, अॅड. अजित बलदोटा, गुरूमुख नारंग, बादशहा शेख, सोहेल खान, योगिनी दिवेकर, विकास खळदकर, रामचंद्र चौधरी, सयाजी ताकवणे, मीना धायगुडे, ताराबाई देवकाते, सचिन गायकवाड, आदी या वेळी उपस्थित होते. 

रमेश थोरात म्हणाले, 'भाजप पदाधिकाऱ्यांची लष्करातील सैनिक, छत्रपती शिवाजी महाराज आणि महिलांविषयीच्या वादग्रस्त विधानांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आमदार राम कदम सह महिलांचा अनादर करणार्यांचा समाचार घेतलाच पाहिजे. इंधन दरवाढ आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस भरडला गेला असताना सरकार फक्त थापा मारीत आहे. निवडणुकीपुर्वी दिलेल्या आश्वासने न पाळता सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. जाती - धर्मात भांडणे लावणारे सरकार मराठा, धनगर व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर निर्णय घेत नाही. बहुजनांमध्ये फूट पाडण्याचे काम सरकार करीत आहे.' 
                   
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुढाकाराने राम कदम यांच्या प्रतिमेस जोडे मारून शहरातून धिंड काढण्यात आली. अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे व प्रणोती चलवादी यांची यावेळी भाषणे झाली. नायब तहसीलदार धनाजी पाटील यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. 

मुख्यमंत्री गप्प का ..?
एरवी कोणत्याही घटनेवर ट्विट करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम कदम यांच्या विधानावर कोणतेही ट्विट न केल्याने महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी मुख्यमंत्री यांचा यावेळी निषेध केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com