#PlasticBan कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

जुनी सांगवी (पुणे) : प्लॅस्टीक बंदीचे जुनी सांगवी परिसरात सर्वच स्तरातुन स्वागत करण्यात आले आहे. येथील भाजी व्यावसायिक, दुकानदार, मिठाईची दुकाने यासर्व ठिकाणी प्लॅस्टिक पिशवीला प्रतिबंध करण्यात आला आहे. तशा आशयाचे फलक आता जागोजागी दिसत आहेत. भावी पिढीचा व निसर्गाच्या दृष्टीने प्लॅस्टीक पिशव्यांचे दुष्परिणाम जनसामान्यात समजावुन सांगण्यासाठी येथील बालाजी महिला प्रतिष्ठाण व नगरसेवक हर्षल ढोरे यांच्या सहकार्याने कापडी पिशवी तयार करण्याचे प्रशिक्षण महिलांना दिले जाणार आहे.

आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिक पिशवीला पर्याय म्हणून आता आपण कापडी पिशव्या वापरण्याची सवय लावली पाहिजे. म्हणून, आम्ही कापडी पिशवी तयार करणे प्रशिक्षण उपक्रम राबवत आहोत.असे बालाजी महिला प्रतिष्ठाणच्या अनुश्री ढोरे यांनी सांगितले.

शनिवार (ता. 30) जून व रविवार ता. 1 जुलै रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेत मारुती मंदिर, जुनी सांगवी  येथे सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून परिसरातील महिलांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन बालाजी महिला प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: training of making cloth bags