PDCC च्या वतीने सहकारी सोसायटीच्या २६२ सचिवांना प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PDCC च्या वतीने सहकारी सोसायटीच्या २६२ सचिवांना प्रशिक्षण

PDCC च्या वतीने सहकारी सोसायटीच्या २६२ सचिवांना प्रशिक्षण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्यावतीने (पीडीसीसी) जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या २६२ सचिवांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उदघाटन बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

गाव पातळीवरील विविध कार्यकारी सोसायट्या या ग्रामीण भागातील आर्थिक वाहिनी समजल्या जातात. त्यामुळे वाढत्या स्पर्धात्मक युगामध्ये या सेवा सोसायट्या सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत थोरात यांनी यावेळी व्यक्त केले. केंद्र पुरस्कृत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत ही कार्यशाळा आयोजित केली होती.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

यावेळी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंकेचे (नाबार्ड) उपमहाव्यवस्थापक डॉ. प्रदीप पराते, जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले, जिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, उपमहाव्यवस्थापक छगन इंगळे, सहायक सरव्यवस्थापक गिरीश जाधव, सल्लागार दत्तात्रेय थोरात आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत जिल्ह्यातील २६२ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांचे सचिव उपस्थित होते.

loading image
go to top