ग्रामीण भागात रुग्णसेवेसाठी प्रशिक्षण

Sakal-Social-Foundation
Sakal-Social-Foundation

पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन व लॉगिन एज्युकेशन इन्स्टिट्यूटतर्फे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील होतकरू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी रुग्णसेवेला पूरक असणारे जनरल ड्युटी असिस्टंट व नर्सिंग असिस्टंट हे दोन अल्पमुदतीचे रोजगाराभिमुख पॅरामेडिकल अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहर तसेच ग्रामीण भागात रुग्णसेवेसाठी प्रशिक्षित कर्मचारी कमी पडत होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होऊन सर्व रुग्णालयांमध्ये स्वयंसेवकांची गरज निर्माण झाली होती. दहावी-बारावी पास विद्यार्थ्यांसाठी जनरल ड्युटी असिस्टंट व नर्सिंग असिस्टंट हे दोन कोर्स एक सुवर्णसंधीच आहे. जनरल ड्युटी असिस्टंट हा कोर्स प्रत्यक्ष ट्रेनिंगसहित सहा महिन्यांचा तर नर्सिंग असिस्टंट आठ महिन्यांचा कोर्स आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षित विद्यार्थ्यांना पुणे शहर व जिल्हा परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे.

लॉगीन एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचालित, पॅरामेडिकल कॉलेज, सासवड व लॉगीन एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचालित श्री समर्थ पॅरामेडिकल कॉलेज, धनकवडी पुणे या दोन शाखांमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहे. 
प्रवेशासाठी संपर्क : सासवड शाखा ः ९०४९२०५५९१, धनकवडी शाखा ः ७२७६०३१८६८.

दानशूरांना आवाहन
जनरल ड्युटी असिस्टंट व नर्सिंग असिस्टंट हे दोन अल्पमुदतीच्या रोजगाराभिमुख पॅरामेडिकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काच्या मदतीसाठी ‘सकाळ सोशल फाउंडेशन’कडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, खासगी कंपन्या व आस्थापना (सीएसआर कंपन्या) यांना ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या उपक्रमासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ला दिलेली आर्थिक मदत ही प्राप्तिकर कायद्याच्या ८० जी कलमानुसार सवलतीस पात्र आहे.

अशी करा मदत...
आपण आपली मदत ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या खालील खात्यात आरटीजीएस अथवा ऑनलाइन पेमेंटने पाठवू शकता. त्यासाठी बॅंकेचा तपशील खालीलप्रमाणे.

  • Name :- Sakal Social Foundation
  • Bank Account No : ४५९१०४००००२१२५२
  • Name of Bank A IDBI bank, Laxmi Road,Pune.
  • IFSC Code : IBKL००००४५९
  • किंवा खालील वेबसाइटवर जाऊन डोनेट नाऊ बटनवर क्‍लिक करून मदत पाठवू शकता. तसेच, सोबतचा QR कोड ओपन करून वेबसाईटद्वारे मदत पाठवू शकता.
  • http://sakalsocialfoundation.com/support-our-cause.php
  • ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर ट्रान्झॅक्‍शनचे तपशील (यूटीआर नंबर, पूर्ण नाव, पाठवलेली मदतीची रक्कम आणि पत्ता) पुढील व्हाट्‌सअप नंबरवर ९९६०५००१४३ पाठवावेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com