Wagholi News : वाघोलीत ट्रामा केयर युनिट उभारणार,शासकीय निर्णय - रामदास दाभाडे

वाघोली येथे ट्रामा केयर युनिट उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांनी दिली
Trama care unit set up in Wagholi government decision zilla parishad Ramdas Dabhade pune
Trama care unit set up in Wagholi government decision zilla parishad Ramdas Dabhade punesakal

वाघोली – वाघोली येथे ट्रामा केयर युनिट उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे यांनी दिली.येथील केसनंद फाट्यावरील मोकळ्या जागेत जागेत हे सेन्टर उभे राहणार आहे. दाभाडे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मागणी केली होती.

वाघोली, आजूबाजूचा परिसर, राष्ट्रीय महामार्ग व पुण्यात ससून रुग्णालयात जाण्यासाठी लागणारा वेळ यामुळे रुग्णाचा धोक्यात येणारा जीव याची माहिती आरोग्यमंत्र्यांना देऊन ट्रामा केयर युनिटची किती गरज आहे. याची माहिती दिली होती. आरोग्य मंत्र्यांनी ही गरज लक्षात घेऊन ट्रामा केयर युनिट उभारण्याला मान्यता दिली.

Trama care unit set up in Wagholi government decision zilla parishad Ramdas Dabhade pune
Pune : टॅंकरची प्रतिक्षा सकाळी, हेच आमच्या भाळी

विशेष बाब म्हणून हे युनिट उभारले जाणार आहे. याबाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे. जागा, बांधकाम व पद निर्मिती करण्याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सह सचिव अशोक आत्राम यांनी हा आदेश काढला आहे.

Trama care unit set up in Wagholi government decision zilla parishad Ramdas Dabhade pune
Nashik Crime: मोबाईल चोरल्याच्या संशयावरून एकावर प्राणघातक हल्ला; दोघांना अटक

मी, उपसरपंच महेंद्र भाडळे व अन्य जणांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पाठपुरवठा केला होता. त्याला यश आले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही यासाठी सकारात्मक पाठिंबा दिला. — रामदास दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com