Nashik Crime: मोबाईल चोरल्याच्या संशयावरून एकावर प्राणघातक हल्ला; दोघांना अटक

Beating
Beatingesakal
Updated on

Nashik Crime : धुव्रनगर येथील रेन्ब्रो स्कुलच्या पाठीमागील परिसरात मोबाइल चोरल्याच्या संशयातून तिघांनी एकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्यानंतर थेट चॉपरने हल्ला करीत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या हल्ल्यात शुभम किरण राजगुरू (रा. राज्य कर्मचारी वसाहत, अशोक नगर) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी संशयित तिघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. (One assaulted on suspicion of stealing mobile phone Both were arrested Nashik Crime)

मुख्य संशयित नारायण कांबळे (रा. शिवाजीनगर), दीपक राजेंद्र चव्हाण (३१, रा. साई अॅव्हॅन्यु, धुव्रनगर), प्रेम प्रदीप व्याळीज (१८, रा. गोकुल हाईट, धृवनगर) अशी संशयितांची नावे आहेत. जखमी शुभम राजगुरू यांची पत्नी ऋतूजा राजगुरू यांच्या फिर्यादीनुसार, चव्हाण आणि व्याळीज हे गल्लीतल्या कोपऱ्यावर उभे होते.

तिथे मोबाइल गहाळ झाल्याने त्यांनी शोध सुरू केला. शुभमने हा मोबाइल चोरल्याचा त्यांना संशय आला. ते पाठलाग करीत त्याच्यापर्यंत पोहोचले. तिथे त्याने मोबाइल न घेतल्याचे सांगूनही दोघांनी मारहाण केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Beating
Nagar Crime : पाच वर्षांपासून फरार असलेल्या मिथून काळेस आखोणीत अटक

व्याळीजने लाकडी दांडक्याने मारहाण करुन शुभमला जखमी केले. गेल्या शनिवारी (ता. ८) रात्री आठ वाजता धृवनगरातील रेन्बो स्कूलच्या पाठीमागे असलेल्या रो-बंगलो शेजारी नाल्याजवळ ही घटना घडली.

याप्रकरणी प्रत्यक्षदर्शींसह तांत्रिक तपासातून पोलिस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांनी संशयित चव्हाण आणि व्याळीज यांना अटक केली आहे. तर मुख्य संशयित नारायण कांबळे हल्ल्यानंतर पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Beating
Mumbai Crime : भाजपा आमदारांच्या नावाचे फेक फेसबुक अकाऊंट ; महिलांना हाय, हॅलो, भेटू शकता का ? मेसेज पाठवणाऱ्या तरूणाला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com