

900 Doctors to Return to Original Posts; State Issues Strict Transfer Orders
sakal
पुणे : राज्यातील तब्बल ९०३ तज्ज्ञ डॉक्टरांना सध्या कार्यरत पदावरून त्यांच्या मूळ संवर्ग पदावर परत पाठविण्याचा आदेश आरोग्य विभागाच्या सचिवांनी काढल्याने डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने हरकती न मागवता परस्पर तसेच त्रुटी असलेला आदेश काढल्याने डॉक्टरांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे.