Police Officers Transfer : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Pune Police
Pune Policesakal

पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सोमवारी आदेश काढले.

शहर पोलिस दलातील २३ पोलिस निरीक्षक, १९ सहायक पोलिस निरीक्षक आणि ७६ पोलिस उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षकाचे नाव आणि कंसात पूर्वीचे आणि बदलीचे ठिकाण -

रजनीश निर्मल (आर्थिक गुन्हे शाखा ते गुन्हे शाखा, प्रशासन), गणेश माने (आर्थिक गुन्हे शाखा ते गुन्हे शाखा, एमओबी), नरेंद्र मोरे (गुन्हे शाखा, प्रशासन ते वरिष्ठ निरीक्षक, लष्कर पोलिस ठाणे), संदीपान पवार (वाहतूक शाखा ते वरिष्ठ निरीक्षक, बंडगार्डन पोलिस ठाणे), किरण बालवडकर (उत्तम नगर पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष), दीपाली भुजबळ (गुन्हे शाखा, एमओबी ते वरिष्ठ निरीक्षक, उत्तमनगर पोलिस ठाणे), नीलिमा पवार (कोरेगाव पार्क पोलिस ठाणे ते वाहतूक शाखा), सुनील झावरे (स्वारगेट पोलिस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), सुरेशसिंग गौड (मार्केट यार्ड पोलिस ठाणे ते स्वारगेट), अरविंद माने (शिवाजीनगर पोलिस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), चंद्रशेखर सावंत (सायबर पोलिस ठाणे ते वरिष्ठ निरीक्षक, शिवाजीनगर), जयराम पायगुडे (पर्वती पोलिस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा), नंदकुमार गायकवाड (दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक ते वरिष्ठ निरीक्षक पर्वती पोलिस ठाणे), राजेंद्र लांडगे (चंदननगर पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष), मनीषा पाटील (चंदननगर-गुन्हे ते वरिष्ठ निरीक्षक चंदननगर), सविता ढमढेरे (बिबवेवाडी पोलिस ठाणे ते विशेष शाखा), स्वप्नाली शिंदे (मार्केटयार्ड -गुन्हे ते वरिष्ठ निरीक्षक मार्केटयार्ड पोलिस ठाणे), विनय पाटणकर (वानवडी ते बिबवेवाडी पोलिस ठाणे), गणेश उगले (आर्थिक गुन्हे शाखा ते कल्याण), संदीप भोसले (कोंढवा ते सायबर पोलिस ठाणे), दादा गायकवाड (विश्रामबाग ते वाहतूक शाखा), विजय खोमणे (पर्वती ते सायबर पोलिस ठाणे), अजय वाघमारे (खंडणी विरोधी पथक ते दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक-२).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com