मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार नुकसानभरपाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

पुणे - खराडी येथे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन त्यात मृत्यू झालेल्या दोन संगणक अभियंत्यांना सात महिन्यांनंतर न्याय मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव महावितरण कंपनीने तयार केला असून, लवकरच त्यास मान्यता देण्यात येईल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

खराडी येथील झेन्सार कंपनीच्या समोरील पदपथावर असलेल्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन तेथे चहा पिण्यासाठी आलेल्या संगणक अभियंते असलेल्या मुला-मुलीचा मृत्यू झाला होता. मात्र, या प्रकरणात महावितरणने हात वर करीत त्यांची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी महावितरणविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात ऊर्जा विभागाच्या खराडी येथील कार्यकारी अभियंत्यांनी या प्रकरणाचा खोटा अहवाल दिला असल्याचे समोर आले होते. हे सर्व प्रकरण ‘सकाळ’ने उघडकीस आणले होते. त्याचे पडसाद गेल्या अधिवेशनातदेखील उमटले होते.

दरम्यान, यासंदर्भात आमदार जगदीश मुळीक यांनी अधिवेशनात लेखी प्रश्‍न विचारला होता. त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी त्यास लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे या दोन्ही संगणक अभियंत्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळणार आहे.

नागनाथ पाटील यांचे निलंबन
खराडी प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता नागनाथ पाटील यांना महावितरणकडून नोटीस बजाविण्यात आली होती; परंतु इस्लामपूर येथे एका बलात्कार प्रकरणात पाटील यांना अटक झाली. तीन दिवस पोलिस कोठडी झाल्याने त्यांना शासनाकडून निलंबित करण्यात आले आहे.

Web Title: Transformer Blast Compensation Chandrashekhar Bavankule