पुण्यातील 'त्या' मॉलने तृतीयपंथीयासाठी घातल्या पायघड्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

वडगाव शेरी :  तृतीयपंथी म्हणून ज्या फिनिक्स मॉलने प्रबेश नाकारला होता त्याच मॉलने त्याच प्रवेशद्वारावर आज तृतीयपंथी असलेल्या सोनाली दळवी हीच स्वागत करून जाहीर माफी मागितली. अन सोनालीने आत्मसन्मानानासाठी सुरू केलेल्या लढाईला यश आले.

यासाठी खासदार वंदना चव्हाण यांनी पुढाकार घेतला.  फिनिक्स मॉलचे केंद्र संचालक राजीव मल्ला यांनी सोनालीचे स्वागत केले आणि बिनशर्त माफी मागीतली. यावेळी माजी आमदार बापू पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव, उषा कळमकर, मीनल सरोदे, मनोज पाचपुते, नारायण गलांडे, सुरेखा कवडे, राकेश कामठे आदी उपस्थित होते.

वंदना चव्हाण यांनी सोनाली आणि मॉल प्रशासनात चर्चा घडवून आणली. त्यांनतर सोनाली म्हणाली, मॉल प्रशासनाने माफी मागितली, त्यामुळे हा विषय संपला आहे. समाजाने आम्हाला स्वीकारावे आणि प्रेम द्यावे इतकीच आमची अपेक्षा आहे. 

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, समाजातील प्रत्येक घटकाला आशा प्रत्येक ठिकाणी आदराची वागणूक मिळावी. लैंगिक अस्पृश्यता पाळली जाऊ नये. याविषयी कायदा होईल परंतु तोपर्यंत मॉलने पुन्हा असे होऊ नये म्हणून स्वतःच्या कार्यपद्धतीत काही मार्गदर्शक तत्वे पाळावीत आणि आदर्श घालून द्यावा, तसेच तृतीयपंथीयांना नोकरी द्यावी.

Web Title: Transgenders welcomed in pune mall news