मांजरी - दहा किलोमीटरच्या प्रवासाला तब्बल एक 

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मांजरी - दिवसा परवानगी नसतानाही प्रवास करणारी अवजड वाहने, थांबा सोडून थेट अर्ध्या रस्त्यात उभ्या राहणाऱ्या बस, कोंडीमुळे चुकत असलेल्या सिग्नच्या वेळा आणि मिळेल त्या ठिकाणाहून धोकादायक प्रवास करणाऱ्या रिक्षा व दुचाकी यामुळे हडपसर ते शनिवार वाडा अशा केवळ दहा किलोमीटरच्या प्रवासाला तब्बल एक तास वेळ लागत आहे.

मांजरी - दिवसा परवानगी नसतानाही प्रवास करणारी अवजड वाहने, थांबा सोडून थेट अर्ध्या रस्त्यात उभ्या राहणाऱ्या बस, कोंडीमुळे चुकत असलेल्या सिग्नच्या वेळा आणि मिळेल त्या ठिकाणाहून धोकादायक प्रवास करणाऱ्या रिक्षा व दुचाकी यामुळे हडपसर ते शनिवार वाडा अशा केवळ दहा किलोमीटरच्या प्रवासाला तब्बल एक तास वेळ लागत आहे.

हडपसर उपनगर गेल्या काही वर्षांत वेगाने विस्तारले आहे. मगरपट्टा, अमनोरा सिटी सारख्या स्वतंत्र वसाहती, आयटी पार्क यामुळे मोठ्या प्रमाणातील नागरिकांनी वास्तव्यासाठी या भागाला पसंती दिली आहे. मात्र, गेल्या पंचवीस- तीस वर्षांपासूनच गंभीर असलेला येथील वाहतूक प्रश्न आजही अत्यंत गंभीर अवस्थेत आहे.

वाहतुकीच्या नियोजनासाठी या मार्गावर केल्या गेलेल्या उपाययोजना आणि बीआरटी, सायकलट्रँक सारखे प्रयोग फोल ठरलेले आहेत. त्याचाच वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. दुमजली उड्डाणपूल बांधूनही हडपसर-गाडीतळ येथील वाहतूक कोंडी सुटलेली नाही. गाडीतळ येथे बसविलेले सिग्नलचे वेळापत्रक वारंवार चुकत आहे. त्यामुळे प्रवास सुरू होणाऱ्या ठिकाणीच पाच-दहा मिनिटांचा खोळंबा अनुभवास येतो. 

पालिका हद्दीत दिवसा जड वाहनांना बंदी असतानाही जड वाहतूक सर्रास सुरू असलेली दिसते. बीआरटी सोडून असलेल्या प्रत्येक बसथांब्यावर उभु राहणारी बस थेट रस्त्याच्या मधोमध उभी राहिलेली दिसते. त्यामुळे इतर वाहनांना प्रवास करताना अडथळा निर्माण होत आहे. रिक्षा व दुचाकी बीआरटीसह सायकलट्रँक व पादचारी मार्गावरून धोकादायकपणे प्रवास करताना दिसतात. वाहतूक पोलिसांची कमतरता असल्याने काळुबाई चौकात कोंडी जाणवली.

गाडीतळ ते रेसकोर्स टर्फक्लब पर्यंतच्या सर्व चौंकात दोन- तीन वेळा सिग्नल मिळाला तरी वाहतूक कोंडी सुटत नाही. गाडीतळ, वैदुवाडी, रामटेकडी, फातिमानगर, टर्फक्लब या चौकांत मोठी कोंडी जाणवते. नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना दररोज त्यासाठी नियोजित वेळेपेक्षा सुमारे एक तास आगोदर बाहेर पडावे लागते. 

Web Title: transoprt difficulties in Manjari