तीन दिवसांत केला १६० किलोमीटरचा पायी प्रवास

करजगाव येथील मारुती मंदिरात मानस बेडेकर व त्याचे वडील.
करजगाव येथील मारुती मंदिरात मानस बेडेकर व त्याचे वडील.

पुणे - आमच्या गावातलं मारुती मंदिर दिसलं आणि माझं भानच हरपून गेलं, कारण आम्ही यापूर्वी एसटी, दुचाकी, मोटार आणि सायकलने पुण्यातून गावाला आलो. परंतु इतक्या लांबवर पायी प्रथमच प्रवास केला होता. बाबांच्या प्रेरणेने आम्ही हे अंतर कापू शकलो... मानस बेडेकर सांगत होता. मानसने नुकताच वडिलांसह पुणे ते दापोली व तिथून पुढे करजगाव असा पायी प्रवास केला. हे अंतर होते १६० किलोमीटर आणि ते कापले केवळ तीन दिवसांत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमुळे घरात बसून कंटाळलेल्या बाबांच्या मनात दापोलीला चालत जाण्याचा विचार आला. कोणी सोबत मिळाली तर बरच होईल, असे म्हणताच मी येतो म्हणालो, मानस सांगत होता. तो म्हणाला, ‘दुसऱ्या दिवसापासून तळजाईवर जात चालायचा सराव सुरू केला.आम्ही मग गुगल सर्च केलं आतून शॉर्टकट्स शोधायला लागलो. आम्ही ६ तारखेला पहाटे चालायला सुरुवात केली. वरंधा घाटामार्गे ठरल्याप्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. पुणे ते करजगाव हेच अंतर साधारण १६० किलोमीटर होणार होतं.

आम्ही पुणे-वेल्हा-केळद-रानवडी-महाड-लाटवण-दापोली आणि करजगाव असा मार्ग निवडला. आम्ही तिसऱ्या दिवशी गावी पोचलो. या प्रवासात जाणवले बाबांमधील ऊर्जा माझ्यापेक्षा दसपटीने जास्त होती. वाटेत आम्हाला विशेषतः घाट रस्ते चढताना काही वेळा त्रास सहन करावा लागला. परंतु सभोवतालचा निसर्ग पाहून सर्व क्षीण दूर व्हायचा. तीन दिवसांनंतर गावातील मारुती मंदिर दिसले. गावांत जोरदार स्वागत झाले, त्यामुळे तीन दिवसांचा सारा क्षीण कोठल्या कोठे पळून गेला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com