Accident : ट्रॅव्हल्स बसवर रिक्षा आदळून प्रवाशाचा मृत्यू

ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून रिक्षा जोरात धडकून झालेल्या अपघातात रिक्षातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला.
accident
accidentesakal

पुणे - ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून रिक्षा जोरात धडकून झालेल्या अपघातात रिक्षातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ नऱ्हे परिसरात घडली. अपघातानंतर बसचालक पसार झाला आहे.

यशवंत नारायण झांजुर्णे (वय ५४, रा. नवतरुण चाळ, विक्रोळी, मुंबई) असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याबाबत झांजुर्णे यांचा मुलगा अनिकेत (वय २४) याने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी ट्रॅव्हल्स बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचे वडील यशवंत झांजुर्णे आणि नातेवाइकांसमवेत पहाटे साडेपाचच्या सुमारास रिक्षातून जात होते.

नवले पुलाजवळ उतार संपल्यानंतर नऱ्हे भागात खासगी प्रवासी बससाठी थांबा नाही. परंतु बसचालकाने अचानक बस थांबवली. त्यावेळी रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा बसवर पाठीमागून जोरात आदळली. त्यात रिक्षाातील प्रवासी यशवंत झांजुर्णे गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com