पुण्यात मुसळधार पावसाने पडली झाडे अन् घरातही शिरले पाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

 रात्रभर मुसळधार कोसळणऱ्या पावसामुळे शहर परिसरात गेल्या 12 तासात 24 ठिकाणी रस्त्यावर, पार्किंग व घरामध्ये पाणी शिरले तर 13 ठिकाणी झाडपडी अशा एकूण 37 घटनांची अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे नोंद झाली आहे

पुणे :  रात्रभर मुसळधार कोसळणऱ्या पावसामुळे शहर परिसरात गेल्या 12 तासात 24 ठिकाणी रस्त्यावर, पार्किंग व घरामध्ये पाणी शिरले तर 13 ठिकाणी झाडपडी अशा एकूण 37 घटनांची अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे नोंद झाली आहे

घरात, पार्किंगमध्ये, रस्यावर आणि इतर विविध 24 ठिकाणी पाणी आल्याच्या घटना घडल्या. त्यात येरवडा, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कोंढवा, खडी मशीन चौक नर्हे, भूमकर चौक धनकवडी, मोहननगर येरवडा, शांतीनगर, विश्रांतवाडी, बावधन, फातिमानगर, गोखलेनगर, पोलिस वसाहत कोंढवा, अंगराज ढाबा येरवडा, डेक्कन कॉलेज, पाषाण तलाव, अप्पा बळवंत चौक, येवलेवाडी, कात्रज स्मशानभूमी खडकीबाजार, रेल्वे पूल, धायरी, रायकर मळा, शिवाजीनगर, जुना तोफखाना, डेक्कन चौक, आंबेगाव स्मशानभूमी, कल्याणीनगर, मंडई, शुक्रवार पेठ नवी पेठ या भागाचा समावेश आहे.

धुवाधार पाऊस अन वाहतूक कोंडीने अशी झाली पुणेकरांची दैना

शहरात झाड, फांदी पडल्याच्या घटना 13 घटना घडल्या.
हडपसर, सिझन मॉल
गुरवार पेठ, चर्चजवळ
बाणेर, कळमकर वस्ती
बाणेर रोड, भंडारी शोरुम
शिवाजीनगर, हार्डिकर हॉस्पिटल
बिबवेवाडी, चिंतामणी नगर
नवी पेठ, विठ्ठल मंदिर
येरवडा, अग्रेसन भवन
सिंहगड रस्ता, अभिरुची मॉल
डेक्कन पोलिस ठाणे.
पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस; आणखी दोन दिवस पावसाची शक्यता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trees Collapsed and water to enter the house due to heavy rainfall in pune