'भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, न्यू लॉ कॉलेज' मध्ये 'फायनान्स, बँकिंग व टॅक्ससेशन केंद्र' सुरू करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने 'न्यू लॉ कॉलेज' व 'एस.सी.सी ऑनलाईन' ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पारख यांचे 'आर्थिक संकट व आर्थिक नियोजन' या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आले होते. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य. डॉ. भाग्यश्री देशपांडे, केंद्राचे प्रमुख सुकृत देव, सहायक प्राध्यापक डॉ. सलील श्रींगारपुरे यावेळी उपस्थित होते.
पुणे : "प्रत्येकाने स्वतःच्या करिअरमध्ये केलेली गुंतवणूक हीच सर्वात महत्वाची गुंतवणूक असते. गुंतवणुकीचा ट्रेंड आता बदलताना दिसत आहे. लोक आता दीर्घ ऐवजी अल्प कालावधीच्या गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत," अशी माहिती सनदी लेखापाल रिषभ पारख यांनी दिली.
ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
'भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, न्यू लॉ कॉलेज' मध्ये 'फायनान्स, बँकिंग व टॅक्ससेशन केंद्र' सुरू करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने 'न्यू लॉ कॉलेज' व 'एस.सी.सी ऑनलाईन' ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पारख यांचे 'आर्थिक संकट व आर्थिक नियोजन' या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आले होते. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य. डॉ. भाग्यश्री देशपांडे, केंद्राचे प्रमुख सुकृत देव, सहायक प्राध्यापक डॉ. सलील श्रींगारपुरे यावेळी उपस्थित होते.
पारख म्हणाले, "आरोग्य, नवीन उद्योग, नव्या अनुभवाचा पाठलाग करणे, समांतर करिअर करणे, अशी ध्येय आता नागरिक साध्य करू पाहत आहेत. त्यानुसार त्यांची मानसिकता बदलली आहे.
पुणे विद्यापीठाने करून दाखविले; कोरोनामुळे सुरक्षितपणे परीक्षा घेण्याचे होते मोठे आव्हान
डॉ. देशपांडे म्हणाल्या, "लॉकडाउनमुळे आज पूर्ण देशाची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे आर्थिक नियोजनाबाबत योग्य ते मार्गदर्शन नागरिकांना मिळणे आवश्यक आहे.
नागरिकांना आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे आणि सामान्य जनतेला आर्थिक, बँकिंग व कर कायद्याची माहिती मिळावी म्हणून हे केंद्र सुरु करण्यात आले आहे.
देव म्हणाले,"आताच्या काळात आर्थिक नियोजनाचे महत्व वाढले आहे. आर्थिक तडजोड करायची गरज आहे. देशावर आलेल्या संकटामुळे निर्माण झालेला आर्थिक ताणतणाव कसा टाळता येईल हे तपासणे महत्वाचे आहे. तसेच ही वेळ पैशाबाबत माणुसकी दाखवण्याची आहे.”
खडकवासला धरणातून पुन्हा विसर्ग वाढवला; जाणून घ्या धरणांमधील पाणीसाठा!
लोकांना व्यक्तिगत आराखडा द्यायला हवा :
आताच्या काळात व्यवसायिकांना स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर ग्राहकांच्या विचार व वेळेच्या पुढे चालणे गरजेचे आहे. लोकांना व्यक्तिगत आराखडा द्यायला हवा, सर्वांचा मिळून नाही. मालमत्ता वाढवताना सर्व क्षेत्रात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. ज्ञान सर्वांकडे आहे. पण ते कुठे आणि कसे वापरायचे ते समजणे महत्वाचे आहे, असे पारख म्हणाले.
खडकवासला धरणातून विसर्ग वाढला; भिडे पुलाबाबत महत्त्वाचे अपडेट