#छोटीप्रेमकथा : ...म्हणून फेसबुकवर सुरू झाला प्रेम कथांचा ट्रेंड!

The trend of Small love stories started on Facebook
The trend of Small love stories started on Facebook

पुणे : लॉकडाऊन संपणार असल्याने कधी एकदा एप्रिलची 14 तारीख येतेय, अशी वाट सगळेच पाहत होते. लॉकडाऊन संपल्यावर घराच्या चार भिंतींना सोडून बाहेरचं जग बघू, आता फेसबुकवर ही फोटो टाकून कंटाळा आला आहे, असे वाटत असतानाच देशातील लॉकडाऊनचा कालावधीही वाढवण्यात आला. वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे फेकबुकवर छोट्या प्रेम कथांचा ट्रेंड सुरू झाला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनचा काळात सोशल मीडिया हा सगळ्यांचाच मनोरंजनाचा एकमेव पर्याय ठरला आहे. त्यात फेसबुकवर चालणारे #ट्रेंड हे सुद्धा तितकेच गमतीआशीर ठरत हेत. जुन्या फोटोंवर कंमेंट करण्यापासून ते चॅलेंज करण्यापर्यंत सगळं काही करून झाले आहे. मात्र सध्या आता फेसबुकवरच्या एका नव्या ट्रेंडनी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा आगळा वेगळा ट्रेंड आहे छोट्या प्रेम कथांचा. अगदी गमतीशीर पद्धतीत एकाच ओळीत सांगणारी कथा. म्हणजेच #छोटी प्रेम कथा.

तू पत्रकार आणि मी डॉक्टर, जमेल का रे ?
नाय नको मी घरी नाहीच सांगणार....
#सुरूहोण्याआधीचसंपलेलीप्रेमकथा

मुलगा झाला तर तुझं नाव ठेवेन....
#एकछोटीप्रेमकथा

मी - आज काय सुंदर दिसतीयेस !
ती- सकाळ पासून हे ऐकणारी मी कितवी आहे ?
#छोटीशीप्रेमकथा

आपण फ्रेंड्स म्हणून राहू ! सॉरी!
#छोटीप्रेमकथा

अशा एक दोन ओळींमध्ये सुरू होण्या आधीच संपलेली प्रेम कथा म्हणजेच छोटी प्रेमकथा होय. मात्र साध्या या छोटी प्रेमकथाच्या नावावर सगळ्यांची घुसमट आणि गुपित अनुभव बाहेर निघतायेत. या ट्रेंड बद्दल बोलताना आयटी कर्मचारी सारिका मलखेडकर म्हणाली, "हा ट्रेंड मला खूप आवडला. फोटो टाकणे, कमेंट करणे हा जरी सध्या ट्रेंड असला तरी देखील ते फेसबुकवर नेहमीचंच काम. पण या ट्रेंडची गोष्ट वेगळी आहे. आपल्या जीवनातील 'ती' छोटी प्रेमकथा नेमकी कशी संपते ते मजेशीर पद्धतीत मांडण्यात येत आहे. तसेही वर्क फ्रॉम होम असल्याने काम तर करावंच लागत आहे. मात्र या सर्व छोट्या प्रेमकथा वाचून आपली सुद्धा अशीच सुरू होण्या पूर्वी संपली हे बघायला मिळत आहे."


आरेच्या दुधाच्या टेम्पोत बियरच्या बाटल्या; पोलिसांनी अशी पकडली तस्करी!
"प्रेमाचा प्रवास दोन ओळींत मांडणे खरं तर अवघड आहे. मात्र या ट्रेंडमुळे तेही शक्य झाले आहे. ट्रेंडच्या कमेंट वाचून जाम हसू येत आहे. लॉकडाऊनच्या काळात मनोरंजनासाठी हे एक चांगले माध्यम ठरत आहे."
- कोमल शेट्टी, विद्यार्थिनी

अशा आहेत या #छोट्या प्रेमकथा 

* तो : चिठ्ठी मिळाली का ?
ती : दादा वाचतोय.
#छोटी_प्रेमकथा

* तू भेटली नाहीस तरी चालेल..
पुस्तकं दे माझी आधी नेलेली !

* त्याचे मित्र त्याला तब्बू
बोलतात आणि माझ्या मैत्रिणी मला तब्बू!
#छोटीप्रेमकथा

* तू गाँव में, मैं शहर में ...
जिंदगी फस गई लॉकडाउन में !
#छोटीशी प्रेमकथा

* तो मुंबई
ती मॉरिशस
#छोटीशीप्रेमकथा

* 'आय कांट लिव्ह विदाऊट यू' पासून ते "नरकात जा " पर्यंत चा प्रवास,,,

#छोटी_प्रेमकथा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com