तीन अनोख्या सहलींचा आनंद लुटण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

मधुरांगणचे सभासद व्हा आणि मिळवा ‘दोघी’ नाटकाची प्रवेशिका

पुणे - ‘सकाळ मधुरांगण’ने मधुरांगण सभासद, त्यांचे कुटुंबीय व ‘सकाळ’च्या वाचकांसाठी ‘मार्व्हल टुरिझम’ या प्रख्यात पर्यटन संस्थेच्या सहकार्याने नैनिताल-मसुरी-जीम कॉर्बेट, दुबई, सिंगापूर-मलेशिया-थायलंड सहली आयोजित केल्या आहेत. 

मधुरांगणचे सभासद व्हा आणि मिळवा ‘दोघी’ नाटकाची प्रवेशिका

पुणे - ‘सकाळ मधुरांगण’ने मधुरांगण सभासद, त्यांचे कुटुंबीय व ‘सकाळ’च्या वाचकांसाठी ‘मार्व्हल टुरिझम’ या प्रख्यात पर्यटन संस्थेच्या सहकार्याने नैनिताल-मसुरी-जीम कॉर्बेट, दुबई, सिंगापूर-मलेशिया-थायलंड सहली आयोजित केल्या आहेत. 

‘नैनिताल-मसुरी-जीम कॉर्बेट’ ही ८ दिवस आणि ७ रात्रींची टूर ता. ११ मे रोजी निघणार आहे. या टूरमध्ये नैनिताल येथे केबल कारमधून हिमशिखरांचे दर्शन, शक्तीपिठांपैकी एक असलेल्या नैना देवी मंदिराला भेट, नैनी लेकमध्ये विहार, जीम कॉर्बेट उद्यानाला भेट, हरिद्वारमधील गंगा आरतीला उपस्थिती, लक्ष्मण झुलाचे दर्शन; तसेच मसुरीतील केम्प्टी धबधबा अशा अनेक नयनरम्य ठिकाणांना भेटी देता येणार आहेत.
दुबई टूरमध्ये पारंपरिक डाऊ कुझ सफर, जगातील सर्वांत उंच बुर्ज खलिफाच्या १२४ व्या मजल्यावरून दुबई दर्शन, जगप्रसिद्ध लिमो राइड, फेरारी पार्कमधील मोफत राइड्‌स, अबुधाबी दर्शन, खरेदीसाठी जगप्रसिद्ध मॉल्स्‌ना भेटींचा अंतर्भाव असणार आहे. पाच दिवस आणि चार रात्रींची ही टूर २२ मे रोजी निघणार असून, टूरसाठी मूळ शुल्क रु. ६९ हजार ८४० आहे. 
सिंगापूर-मलेशिया-थायलंड टूरमध्ये अल्काझर शो, स्पीड बोटने कोरल आयलॅंड टूर, सफारी वर्ल्डसोबत मरिन पार्क, केएल टॉवर, सनवे लगून, सॅंटोसा आयलॅंड, नाइट सफारी, युनिव्हर्सल स्टुडिओ, जुरांग बर्ड पार्क अशा अनेक ठिकाणी पर्यटकांना मनमुराद आनंद लुटता येईल. ही टूर ता. ३१ मे व २२ जून रोजी असून, १० रात्र ११ दिवसांच्या या टूरसाठी रु. १ लाख ९ हजार ९८० रु. शुल्क आहे. 

टूरची वैशिष्ट्ये
पुणे ते पुणे (घरापासून घरापर्यंत सेवा)  सर्वांसाठी मोफत ट्रॅव्हलकिट टूरसाठी विमा  कमीत कमी रु. १ लाखापर्यंत पर्सनल लोनची सोय  स्थळ दर्शनासाठी एसी कोच बस  फक्‍त महिलांसाठी स्वतंत्र ग्रुप, महिला व त्यांच्या कुटुंबीयांसह स्वतंत्र ग्रुप  सर्व खर्च अंतर्भूत, कोणतेही छुपे खर्च नाहीत  सर्व टूरकॉस्टमध्ये शासकीय कर अतिरिक्त असतील.  येथे नमूद केलेले शुल्क फक्त ५ मेपर्यंत बुकिंग करणाऱ्यांसाठीच

नोंदणीसाठी संपर्क
सकाळ कार्यालय, ५९५ बुधवार पेठ, मधुरांगण विभाग, दुसरा मजला (सकाळी ११ ते सायंकाळी ७)
मार्व्हल टुरिझम निर्माण आर्केड, शॉप नं. ३६, निगडी जकात नाका, भक्ती-शक्ती चौकाजवळ
ग्रुप बुकिंग असेल तर घरी येऊन बुकिंग घेतले जाईल. 
३० जणांचा एक ग्रुप तसेच प्रत्येकाला पर्यटनाचा आनंद 
लुटता येईल.
अधिक माहितीकरिता : ९०७५०१११४२ किंवा ८३७८९९४०७६ (सकाळी ११ ते सायंकाळी ७)

मधुरांगणची सभासद नोंदणी राजाराम पूल परिसरातील मॅजेंटा लॉन्स येथे होणाऱ्या पुणेरी फेस्टिव्हलमधील ‘सकाळ-मधुरांगण’च्या स्टॉलवर शनिवारी (ता. २९) व रविवारी (ता. ३०) रात्री ९ पर्यंत. या दोन दिवसांत ‘मधुरांगण’चे सभासदत्व घेणाऱ्यांना ‘दोघी’ नाटकाची प्रवेशिका भेट म्हणून मिळेल. नाटक सोमवारी (ता. १ मे) रोजी दु. १२.३० वा टिळक स्मारक येथे आहे.

Web Title: trip by madhurangan