ट्रकच्या डिझेल टाकीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत ट्रक जळून खाक

वारजे माळवाडी : आगीत जळत असलेला ट्रक.
वारजे माळवाडी : आगीत जळत असलेला ट्रक.

वारजे माळवाडी - पिझ्झा बर्गरचे साहित्य घेऊन निघालेल्या ट्रकच्या डिझेल टाकीचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत ट्रक जळून खाक झाला. वारजे माळवाडी येथे पश्‍चिम बाह्यवळण महामार्गावर शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहतूक तासभर ठप्प झाली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हा ट्रक पनवेलहून पिझ्झा बर्गरचे साहित्य घेऊन कोल्हापूरकडे निघाला होता. चालक उद्धव किसन वाघमारे (वय ३१ रा. आकुर्डी, ता. पनवेल) हे ट्रक चालवीत होते. हा ट्रक वातानुकूलित होता. माई मंगेशकर हॉस्पिटलसमोरील उड्डाण पूल चढत असताना ट्रकचालक वाघमारे यांना ब्रेक लागत नसल्याचे जाणवले. तेव्हा त्यांनी ट्रक पुलावर एका बाजूला घेतली. त्यांनी पाहणी केली असता इंजिनमध्ये आग लागल्याचे दिसले. काही क्षणातच आगीने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला. या वेळी डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला. या स्फोटाने टाकीचा एक पत्रा पुलावरून खालच्या रस्त्यावर पडला. दुसऱ्या बाजूला देखील पत्रा उडून पडला. ट्रकमध्ये दूध, तेल यांसह अन्य पदार्थ होते, अशी माहिती कोथरूडचे अग्निशमन अधिकारी गजानन पाथरूडकर यांनी दिली.

घटनास्थळी कोथरूड, सिंहगड रोड व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या. दलाच्या जवानांनी काही वेळेतच आग आटोक्‍यात आणली. या वेळी महामार्गावरील व पुलाखालील  वाहतूक तासभराहून अधिक वेळ कोलमडली होती. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत केली. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com