पिंपरीत उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून उलटला ट्रक

truck
truck

पिंपरी : उड्डाण पुलाच्या कठड्याला धडकून ट्रक पलटी झाला. ही घटना सोमवारी (ता. 14) सकाळी पावणेसातच्या सुमारास निगडीतील पवळे उड्डाण पूल येथे घडली. पुण्याहून देहूरोडच्या दिशेने जाणारा मालवाहतूक ट्रक (केए 32, सी 6381) सकाळी पावणे सातच्या सुमारास निगडीतील पवळे उड्डाण पुलावरून आला.

उड्डाण पुलाच्या सुरवातीलाच चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुलाच्या कठड्याला धडकला. ट्रकचा वेग जास्त असल्याने ट्रक पलटी होऊन समोरील लेनमध्ये पडला. त्यामुळे निगडीहून पिंपरीच्या दिशेने जाणारी पुलाची एक लेन वाहतुकीसाठी बंद ठेवली आहे. ट्रकची पुढची दोन्ही चाके निखळली आहेत. त्यामुळे ट्रक बाजूला करण्यात अडचणी होत्या.

पुलावरील एका लेनची वाहतूक सेवा रस्त्याने वळविल्याने सेवा रस्त्यावर ताण आला होता. वाहनांच्या लांब रांगा लागल्याने टिळक चौकात वाहतूक कोंडी झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com