ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादावरुन एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या नऱ्हे गावच्या सरपंच आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी कांबळे याची पत्नी त्यांच्याविरोधात निवडणुकीला उभा होत्या. निवडणुकीमध्ये फिर्यादीचे पती बाळासाहेब वनशिव व कांबळे यांचे वाद झाले होते.

पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादावरुन महिला सरपंचाच्या पतीच्या अंगावर कार घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवारी सकाळी साडेपाच वाजता आंबेगाव खुर्द येथे घडली. 

बाळासाहेब सोपानराव वनशिव (वय 52, रा.नरहेगा) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मीनाक्षी बाळासाहेब वनशिव (वय 50) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अविनाश कांबळे (रा. नरहे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या नऱ्हे गावच्या सरपंच आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी कांबळे याची पत्नी त्यांच्याविरोधात निवडणुकीला उभा होत्या. निवडणुकीमध्ये फिर्यादीचे पती बाळासाहेब वनशिव व कांबळे यांचे वाद झाले होते. त्याचा राग कांबळे याच्या मनात होता. दरम्यान बुधवारी पहाटे बाळासाहेब वनशिव व त्यांचे मित्र प्रकाश तिलेकर हे पहाटे फिरण्यासाठी गेले. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाची कार संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, त्याच कारने वनशिव यांना जोरदार धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Trying to kill one in punes village due to gram panchayats election argument