सारसबागेत झाड कोसळले; कुटुंबातील सहाजण जखमी

सारसबागेत झाड कोसळले; कुटुंबातील सहाजण जखमी

पुणे - सारसबागेमधील जुने झाड कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जण जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास घडली. यात एक युवती गंभीर, तर अकरा वर्षांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. 

या घटनेत निकिता नितीन बत्तेल्लू (वय २४), मानसी पेंटा (वय १५), नेहा बत्तेलू, प्रसाद बत्तेल्लू (वय २१), ओम गणेश दुभाष (वय ११, सर्व रा. लष्कर परिसर) व महेश पेंटा (वय ३८, रा. नगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. 

बत्तेल्लू कुटुंबीय बुधवारी दुपारी सारसबागेत आले होते. तेव्हा तेथील सिद्धिविनायक मंदिराच्या शेजारील हिरवळीवर ओम आणि मानसी खेळत होते, तर अन्य सदस्य बसले होते. त्याचवेळी शेजारील गुलमोहराचे झाड अचानक कोसळले. त्यात सहा जण जखमी झाले. यात निकिताच्या डोक्‍याला मार लागला असून, तिच्यासह ओमला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. 

निकिताची प्रकृती गंभीर असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडे या घटनेची माहिती नव्हती. येथील सुरक्षारक्षकांनाही घटनेचे गांभीर्य समजले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली, त्यामुळे जखमींना वेळेत मदत मिळू शकली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com