Pune News : 'टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यात विद्यार्थी पालकांचा गोंधळ

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ४० व्या पदवीप्रदान सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना डि.लीट पदवी बहाल करण्यात येत होती, तोच विद्यार्थ्यां
Pune News
Pune Newssakal

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ४० व्या पदवीप्रदान सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना डि.लीट पदवी बहाल करण्यात येत होती, तोच विद्यार्थ्यांनी सोहळ्याच्या व्यासपीठावर चढत गोंधळ घातला. पदवीप्रदान सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून दोन - तीन महिन्यांपूर्वी शुल्क घेण्यात आले.

त्यानंतर हजारो विद्यार्थी पालकांसह पदवी प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी विद्यापीठात दाखल झाले. विद्यापीठाचा मुख्य पदवी प्रदान सोहळा सुरू झाला. त्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्याचा सभागृहाबाहेर गोंधळ सुरू झाला. पदवी प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी आले असताना काही विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र अद्याप तयार झालेले नाही असे सांगण्यात आले. तसेच, विद्यापीठाच्या आवारात उघड्यावर पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्यात येत होते. डि.लीट पदवीचे मान्यवरांना वितरीत करण्याचा कार्यक्रम सुरू असताना संतप्त विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर येऊन माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.

एकापाठोपाठ एक विद्यार्थी आणि पालक व्यासपीठावर चढले आणि मुख्य कार्यक्रम बंद पडला. ' आम्हाला सन्मानपूर्वक पदवी प्रदान करण्यात यावी ' अशी मागणी करत गोंधळ घातला. यावेळी टिमवि ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी मुख्य कार्यक्रमातून बाजूला येत विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. दरम्यान काही मिनिटांनी मुख्य पदवी प्रदान सोहळा पुन्हा सुरू करण्यात आला.

विद्यापीठाच्या मुकुंदनगर येथील संकुलात सुरू असलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ उद्योजक डॉ. नौशाद फोर्बस, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड आणि लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑ. सोसायटीचे अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर यांना डी.लिट (विद्यानिधीधारक) देऊन गौरविण्यात आले.

Pune News
Pune Crime : पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस चौकीतच गोळी झाडून संपविले स्वतःचे जीवन

यावेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक,  कुलगुरु डॉ. गीताली टिळक, टिमवि ट्रस्टचे विश्‍वस्त डॉ. प्रणती टिळक, विश्‍वस्त सरिता साठे आदी मान्यवर उपस्थित होते. पदवीप्रदान समारंभात २० विद्यार्थ्यांना पीएच.डी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या १,०४६ विद्यार्थ्यांना, पदवी अभ्यासक्रमाच्या १,८४० विद्यार्थ्यांना आणि कौशल्य विकास शाखेच्या १८५ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. तसेच विविध शाखांमधील २२ विद्यार्थ्यांचा सुवर्णपदकाने गौरव करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com