

Tukaram Mundhe Urges Gen Z to Lead Social Change and Build India's Future at Rotary Youth Festival
esakal
पुणे : ‘जेन झी’ ला समाजातील उतरंड मान्य नाही तर त्यांना समानता मान्य आहे त्यांचे हे ‘फीचर’ मला सर्वाधिक आवडते. आमच्या काळात ‘एलजीबीटीक्यू’ बाबत बोलता येत नव्हते त्यावरही तसेच मानसिक समस्यांवरही पिढी बिनधास्तपणे बोलते. ‘जेन झी ला आता ठरवायचं आहे. त्यांना देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची व बदल घडवण्याची सर्वांत मोठी संधी आहे. तुम्ही आणि मी मिळून क्रांती करू शकतो’ अशा शब्दांत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले.