...अन्‌ लागले तुळशीचे लग्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

पुणे - कार्तिक शुद्ध द्वादशी...तिन्ही सांजेचा मुहूर्त...‘स्वस्तिश्री गणनायको गजमुखो’...या मंगलाष्टकांच्या स्वरात बाळकृष्णाच्या प्रतिमेसह तुळशीचे लागलेले लग्न....वऱ्हाडी मंडळींनी तुळस आणि बाळकृष्णाला कवठ, आवळा, चिंच आणि फराळाचा नैवेद्य दाखवीत केलेले प्रसाद वाटप.

महिलांनी एकमेकींची खणा-नारळाने भरलेली ओटी...निमित्त होते नवी पेठ मराठा मंडळ ट्रस्टतर्फे आयोजित सामुदायिक तुळशी विवाह सोहळ्याचे... तुळशी विवाहाकरिता वऱ्हाडी मंडळीही उत्साहाने जमली होती. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. हार-फुलांनी विठ्ठल रुक्‍मिणीच्या मूर्तीची केलेली पूजा अशा धार्मिक वातावरणात तुळशी विवाह संपन्न झाला. अनारसे, शेव, चिवडा, चकली, कडबोळीचा नैवेद्यही दाखविण्यात आला. तुळशीला हिरव्या बांगड्या, आरसा, कापसाचे वस्त्रही वाहण्यात आला, तर बाळकृष्णाच्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. लग्नानंतर तुळस आणि बाळकृष्णाची आरती झाली. 

ट्रस्टचे अध्यक्ष संजय गाडे म्हणाले, ‘‘मंदिरात काकड आरतीची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. या वर्षी आश्‍विन वद्य प्रतिपदा ते कार्तिक वद्य प्रतिपदेपर्यंत काकड्याचे आयोजन केले आहे. देवाच्या मूर्तींना दररोज दही-दुधाने स्नान 
घालण्यात येते. गेल्या पाच वर्षांपासून सामूहिक पद्धतीने तुळशीचा विवाह आयोजित करतो. आसपासच्या सोसायट्यांतील नागरिक लग्नामध्ये सहभागी होतात. तुळशीचे महत्त्व नागरिकांना समजावे याकरिता माहितीपत्रकेही वाटतो.’’ 

Web Title: tulsi marriage