डाळींचे भाव उतरले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

चांगल्या उत्पादनाचा परिणाम; हरभराडाळ स्थिर

पुणे - गेल्या दोन वर्षांपेक्षा या वर्षी जानेवारी महिन्यात हरभराडाळ वगळता इतर डाळींचे भाव कमी झाले आहेत. चांगले उत्पादन आणि साठा मर्यादा यामुळे माल खुल्या बाजारात विक्रीस उपलब्ध होत असल्याने भावांत घट झाली.

चांगल्या उत्पादनाचा परिणाम; हरभराडाळ स्थिर

पुणे - गेल्या दोन वर्षांपेक्षा या वर्षी जानेवारी महिन्यात हरभराडाळ वगळता इतर डाळींचे भाव कमी झाले आहेत. चांगले उत्पादन आणि साठा मर्यादा यामुळे माल खुल्या बाजारात विक्रीस उपलब्ध होत असल्याने भावांत घट झाली.

उत्पादन कमी असल्याने २०१५ आणि २०१६ मध्ये तुरडाळ, हरभराडाळ, उडीदडाळ यांच्या भावांत तेजी निर्माण झाली होती. त्यामुळे स्वाभाविकपणे इतर डाळींचे भावही वधारले होते. गेल्या वर्षी मे महिन्यानंतर तुरडाळीचे भाव उतरू लागले. त्यानंतर हरभराडाळीचे भाव वधारले. हरभराडाळीचा भाव प्रतिक्विंटल साडेतेरा हजार ते चौदा हजार रुपयांपर्यंत पोचला होता. त्यापूर्वी तुरडाळीचे भाव (प्रतिक्विंटल) अठरा हजार रुपयांच्या पुढे गेले होते.

हरभराडाळीचे भाव आयात मालामुळे सध्या उतरले आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यांतील हरभरा उत्पादनाचा हंगाम लांबला असल्याने नवीन मालाची आवक मार्च महिन्यापासून सुरू होईल, असा अंदाज आहे. सध्या नवीन मालाची आवक होत असली तरी ती तुरळक असल्याचे आशिष नहार यांनी नमूद केले. 

व्यापारी जितेंद्र नहार म्हणाले, ‘‘गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत जानेवारी महिन्यात डाळींचे भाव कमी होते. तुरडाळ, मसूरडाळ, मुगडाळ, मटकीडाळ यांचे सध्याचे भाव दोन वर्षांतील सर्वांत कमी आहेत. उडीदडाळ, हरभराडाळीचे भाव कमी झाले असले तरी ते दोन वर्षांपूर्वीच्या भावापेक्षा जास्त आहे. या वर्षी पाऊस चांगला झाला; तसेच भाव मिळत असल्याने कडधान्याचे उत्पादन वाढले. आयात मालाचाही भावावर परिणाम झाला.’’ 

डाळींचे जानेवारी महिन्यातील 
वर्षनिहाय भाव (प्रतिक्विंटल)  
(कंसात दोन वर्षांतील उच्चांकी भाव)
वर्ष     २०१५    २०१६    २०१७ 

तुरडाळ    ७८००    १३७००    ७३०० (१८ हजार रुपये)
मुगडाळ     ८९००    ९१५०    ६२०० (७ हजार २०० रुपये)
मसुरडाळ     ७३००    ६३००    ५८०० ७ हजार २०० रुपये)
हरभराडाळ     ४१००    ५९००    ८४०० (१३ हजार ५०० रुपये)
मटकीडाळ     ८५००    ८७००    ६३०० (८ हजार ५०० रुपये)
उडीदडाळ     ७८००    १४०००    ८६०० (१४ हजार रुपये) 

Web Title: turdal rate decrease