तुषार गांधी प्रकरणी पतीत पावन संघटनेने हात झटकले, पोलिसांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

मॉडर्न महाविद्यालयात तुषार गांधी यांचा कार्यक्रम रद्द झाल्याच्या प्रकरणात पतीत पावन संघटनेने आमचा काहीही संबंध नाही असे सांगत, संघटनेची बदनामी केल्याच्या याविरोधात शिवाजीगनर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पुणे : मॉडर्न महाविद्यालयात तुषार गांधी यांचा कार्यक्रम रद्द झाल्याच्या प्रकरणात पतीत पावन संघटनेने आमचा काहीही संबंध नाही असे सांगत, संघटनेची बदनामी केल्याच्या याविरोधात शिवाजीगनर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गणेशखिंड येथील मॉर्डन महाविद्यालयात "रिव्हिजीटींग गांधी' ही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महात्मा गांधी यांचे पनतू तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन यांना निमंत्रीत केले होते. परंतू पतीत पावन संघटनेने कार्यक्रम उधळून लावल्याची धमकी दिल्याने गांधी यांचे भाषण रद्द केल्याचा आरोप, डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केला होता. यावरून वाद निर्माण झालेला आहे.

पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका

तुषार गांधी यांनी गुरूवारी ट्‌विट करून मॉडर्न महाविद्यालयातील परिषदेला मी उपस्थित राहिल्यास पतीत पावन संघटना कार्यक्रम उधळून लावल्याची धमकी दिली आहे. त्यामुळे माझा कार्यक्रम रद्द झाल्याचे जाहीर केले होते. यामध्ये पतीत पावन संघटनेचा काहीही संबंध नसताना बदनामी केली आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी केली आहे.

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, या राष्ट्रीय परिषदेसाठी तुषार गांधी यांनी निमंत्रीत केले होते. या परिषदेसाठी विद्यापीठाने तीन लाख रुपये दिला आहेत. त्यामुळे राजकीय कार्यक्रमसाठी याचा वापर होऊ नये अन्यथा याविरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला होता. विद्यापीठाकडूनही गोंधळ होणार असल्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे तुषार गांधी यांचे व्याख्यान स्थगीत केले आहे. ही परिषद झाल्यानंतर त्यांचे महाविद्यालयातर्फे स्वतंत्र व्याख्यान आयोजित केले जाणार आहे. दरम्यान, आज डॉ. प्रेरणा उबाळे यांच्या उपस्थितीत परिषदेला सुरूवात झाली. यामध्ये 250 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Tushar Gandhi case Patit Pavan organization does not interfere case filed in police

टॅग्स
टॉपिकस