तक्रारीसाठी नितीन गडकरी यांना 2700 ट्‌विट 

विलास काटे
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

आळंदी (पुणे) : भावाने केलेल्या या फसवणुकीचे गाऱ्हाणे आरटीओ ऐकून घेईना. पोलिसांनीही तक्रार न घेता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे फिर्यादीने थेट केंद्रीय परिवहन मंत्र्यांकडेच तक्रार करण्याचा चंग बांधला आणि त्याने आतापर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अधिकृत ट्‌विटर खात्यावर तब्बल 2700 वेळा ट्‌विट केले आहे. 

सचिन काशिनाथ गव्हाणे यांच्या मालकीचा मालवाहू टेम्पो आहे. त्यांनी 2012 मध्ये तो खरेदी केला होता. हा टेम्पो त्यांनी छोटा भाऊ समीर गव्हाणे याला भाड्याने चालविण्यास दिला. दोन वर्षे समीरने रितसर भाडे दिले. मात्र त्यानंतर हे भाडे देणे बंद केले. अशाप्रकारे, चार वर्षे त्याने भाडे दिले नाही. दरम्यान, त्यावरून सहा महिन्यापूर्वी या दोघांमध्ये भांडण झाले आणि सचिनने समीरकडे टेम्पोचा ताबा मागितला. 

माहिती अधिकारात उघडकीस 
पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी सचिन गव्हाणे यांनी माहिती अधिकारात आरटीओ कार्यालयाकडून टेम्पोबाबत माहिती मागविली. त्यावेळी दोन व्यक्तिंना त्यांचा टेम्पो परस्परच विकला गेल्याचे लक्षात आले. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयातील लिपिक आणि एजंटाला हाताशी धरून भावाच्या मालकीचे वाहन समीरने सचिनच्या परवानगीशिवाय विकले होते. 

कारवाईऐवजी उडवाउडवी 
याबाबत सचिन गव्हाणे यांनी पिंपरी- चिंचवड उपप्रादेशिक कार्यालय आणि पोलिसांकडे तक्रार केली असता, सुरूवातीला त्यांना कारवाईऐवजी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पिंपरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी मात्र सदर प्रकरणात हस्तांतर चुकीच्या पद्धतीने झाल्याचे निदर्शनास आल्यावर चौकशीचे आश्‍वासन दिले आहे. घोडेगाव, मंचर, भोसरी, खेड या पोलिस ठाण्यात जाऊनही विशेष दखल घेतली गेली नाही. या प्रकरणात आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी गव्हाणे यांची मागणी आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tweeted 2700 times to Nitin Gadakri