जुन्नर तालुक्यातील ही सहा काॅलेज ठरली शंभर नंबरी 

रवींद्र पाटे
Thursday, 16 July 2020

जुन्नर तालुक्यातील 33 कनिष्ठ महाविद्यालयांचा बारावीचा सरासरी निकाल ९३.७४ टक्के लागला. परीक्षा दिलेल्या ५ हजार ३१७ पैकी ४ हजार ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सहा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला.

नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्यातील 33 कनिष्ठ महाविद्यालयांचा बारावीचा सरासरी निकाल ९३.७४ टक्के लागला. परीक्षा दिलेल्या ५ हजार ३१७ पैकी ४ हजार ९८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सहा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. २ हजार ७३४ मुलांपैकी २ हजार ४७० मुले पास झाली. तर, २ हजार ५८३ मुलींपैकी २ हजार ५१४  मुली पास झाल्या. निकालात विद्यार्थिनींनी बाजी मारली.

असा चेक करा बारावीचा रिझल्ट

जुन्नर तालुक्यातील ब्लुमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल नारायणगाव, श्री जी. आर. गुंजाळ कनिष्ठ महाविद्यालय आळेफाटा, डॉ. सी. के. कनिष्ठ महाविद्यालय खानापूर, हांडे देशमुख हायटेक कनिष्ठ महाविद्यालय आळेफाटा, शासकीय अनुदानित आश्रमशाळा तळेरान, विद्या निकेतन विद्यालय साकोरी या महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला. मागील वर्षी तालुक्याचा सरासरी निकाल ९७.६७ लागला होता. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी ३.९३ टक्के निकाल कमी लागला. या वर्षी निकालात घट झाली.

आईने सांगितला तसा अभ्यास केला आणि बोर्डाच्या परीक्षेत पहिला आला

तालुक्यातील इतर कनिष्ठ महाविद्यालयांचा शेकडा निकाल पुढील प्रमाणे : अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय ओतूर : ९३.१३, शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर : ९२.६४, सद्गुरू एस. एम. विद्यालय पिंपरी पेंढार : ९१.१३, गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यालय नारायणगाव : ९७.९१, बेल्हेश्वर विद्यालय बेल्हे : ९५.४९, सुभाष विद्या मंदिर पिंपळवंडी : ९७.७७, ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालय आळे : ९४.१५, हिंदमाता विद्यालय वडगाव कांदळी : ८२, पंडित नेहरू विद्यालय निमगाव सावा : ९५.८३, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय ओतूर : ९८.८८, विद्या विकास मंदिर राजुरी : ९२.१७, अंजुमन हायस्कूल जुन्नर : ९३.१०, श्री रंगदास स्वामी विद्यालय आणे : ९२.६८, न्यू इंग्लिश स्कूल आपटाळे : ७१.०५, आणे माळशेज विद्यालय मढ : ९७.८२, शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर : ९३.७५, शासकीय अनुदानित आश्रमशाळा सोमतवाडी : ९७.७२, शासकीय अनुदानित आश्रमशाळा कोळवाडी : ९४.२८, समर्थ कनिष्ठ महाविद्यालय बांगरवाडी : ९८.९२, श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय निमगाव सावा : ९०.६२, ज्ञानराज इंग्लिश मिडियम स्कूल आळे : ९६.५५.
 
 
 
Edited By : Nilesh J shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelfth result of six colleges in Junnar taluka is one hundred percent