सीमेवरील जवानांसाठी पंचवीस हजार राख्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे - सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना भाऊ मानणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी पंचवीस हजारांहून अधिक राख्या सीमेवर पाठविण्यास पुढाकार घेतला. ‘भारत माता की जय’च्या जयघोषात विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या राख्यांचे एकत्र पूजन करण्यात आले. 

सैनिक मित्र परिवार आणि त्वष्टा कासार समाज गणेशोत्सव मंडळातर्फे राखी पौर्णिमेनिमित्त गायिका अनुराधा मराठे यांच्यासह पारंपरिक वेशात आलेल्या लहान मुलांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष सुरेश पोटफोडे, ॲड. बिपिन पाटोळे, अशोक मेहेंदळे, आनंद सराफ, नीता करडे, वीरमाता सुवर्णा गोडबोले, वीरपत्नी दीपाली मोरे, सुनीता गायकवाड, पुष्पा नढे उपस्थित होते.  अनुराधा मराठे यांनी ‘सैनिक हो तुमच्यासाठी...’ या गीताच्या सादरीकरणातून जवानांप्रति आदर व्यक्त केला. मनीषा निजामपूरकर यांनी गायलेल्या ‘ए मेरे वतन के लोगों...’ या गीताने उपस्थित भारावले. 

Web Title: twenty five thousand rakhi for the soldiers